khabarbat

Advertisement

SSC Recruitment : आर्मी शॉर्ट सर्व्हिस कमिशनमध्ये 381 पदांवर भरती

लष्करात नोकरीची सुवर्णसंधी आहे. भारतीय सैन्यात आर्मी शॉर्ट सर्व्हिस कमिशनमध्ये 381 पदांवर भरती करण्यात येणार आहे.

Indian Army Recruitment 2024

अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख : 21 फेब्रुवारी 2024

381 पदांवर भरती

शॉर्ट सर्व्हिस कमिशन भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना इंडियन आर्मी शॉर्ट सर्व्हिस कमिशनच्या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करावा लागेल.

लष्कराच्या अधिकृत भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी आहे. शॉर्ट सर्व्हिस कमिशन भरती अंतर्गत 381 रिक्त पदांवर भरती करण्यात येणार आहे.

यामध्ये 350 पदे SSC (Tech) पुरुषांसाठी, 29 SSC (Tech) महिलांसाठी आणि 2 पदे संरक्षण कर्मचाऱ्यांच्या विधवा उमेदवारांसाठी आहेत.

Army SSC Recruitment 2024

वयोमर्यादा

इंडियन आर्मी शॉर्ट सर्व्हिस कमिशन (Tech) पुरुष, महिला उमेदवारांसाठी, 01 ऑक्टोबर 2024 रोजी वय 20 ते 27 वर्ष यादरम्यान असावे. भारतीय सशस्त्र दलाच्या विधवांसाठी, 1 ऑक्टोबर 2024 रोजी कमाल वय 35 वर्षे आहे.

शैक्षणिक पात्रता

भारतीय सैन्यात शॉर्ट सर्व्हिस कमिशन (Indian Army SSC Job) भरतीसाठी अर्ज करणारे उमेदवार जे अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याशिवाय अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात असणारे उमेदवारही या भरती अंतर्गत अर्ज करण्यास पात्र असतील.

निवडलेल्या उमेदवारांना अभ्यासक्रम सुरू झाल्याच्या तारखेपासून किंवा प्री-कमिशन ट्रेनिंग अकादमी (PCTA) येथे अहवाल देण्याच्या तारखेपासून लेफ्टनंटच्या रँकमध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशन दिले जाईल.

नोकरी विषयक माहितीसाठी : https://khabarbat.com

निवेदन : सदरील नोकरी विषयक माहिती इच्छूकांना संधी मिळावी या हेतूने दिलेली आहे. पद भरती संबंधित अन्य कोणत्याही बाबीशी khabarbat.com तसेच या न्यूज पोर्टलच्या मुख्य संपादकांचा दुरान्वयाने देखील संबंध नाही. याची नोंद घ्यावी.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »