पुण्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ( IIIT Pune Bharti 2024) म्हणजे भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थेने सहाय्यक पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
या प्रक्रियेत पदांच्या एकूण ५४ जागांसाठी भरती होणार आहे. या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण पुणे आहे. इच्छुक उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ मार्च २०२४ आहे.
IIIT Pune Vacancy 2024 : पदाचे तपशील
या भरती मोहिमेंतर्गत सहाय्यक प्राध्यापक(३९), सहायक निबंधक(०३), कनिष्ठ अधीक्षक(०४), शारीरिक प्रशिक्षण सह योग प्रशिक्षक(०१), कनिष्ठ तंत्रज्ञ(०३), कनिष्ठ सहाय्यक(०५( या पदांसाठी भरती केली आहे. एकूण ५४ जागांसाठी भरती होणार आहे.
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सहाय्यक प्राध्यापक – आधीच्या पदवींमध्ये प्रथम श्रेणीसह संबंधित विषयात पीएचडीसाठी अर्ज करू शकता.
सहायक निबंधक – किमान ५५ % गुणांसह पदव्युत्तर पदवी किंवा उत्कृष्ट शैक्षणिक रेकॉर्डसह समतुल्य
कनिष्ठ अधीक्षक – संबंधित क्षेत्रातील ६ वर्षांच्या अनुभवासह प्रथम श्रेणी बॅचलर पदवी
शारीरिक प्रशिक्षण सह योग प्रशिक्षक – पदवीधर शारीरिक शिक्षण (B.P.Ed) अधिक ३ वर्षांचा अनुभव
कनिष्ठ तंत्रज्ञ – कॉम्प्युटर विज्ञान आणि अभियांत्रिकी / माहिती तंत्रज्ञान मध्ये डिप्लोमा / बॅचलर पदवी
कनिष्ठ सहाय्यक – कॉम्प्युटर ऑपरेशन्सच्या ज्ञानासह बॅचलर पदवी
IIIT Pune Vacancy 2024: पदाचे नाव वेतनश्रेणी
सहायक निबंधक ₹ ५६१००/- ₹१,७७,५००/
कनिष्ठ अधीक्षक ₹३५,४००/- ₹१,१२,४००/-
शारीरिक प्रशिक्षण सह योग प्रशिक्षक- ₹३५,४००/- ₹१,१२,४००/-
कनिष्ठ तंत्रज्ञ ₹२१७००/- ₹ ६९१००/-
कनिष्ठ सहाय्यक ₹२१,७००/- ₹६९१००/-
अधिसुचना – https://iiitp.ac.in/sites/default/files/2024-02/Recruitment%20Notice%20Non-Faculty%20IIITP%2008.02.2024.pdf
अधिसुचना – https://iiitp.ac.in/sites/default/files/2024-02/Recruitment%20Notice%20Faculty%20IIITP%2008.02.2024.pdf
अर्ज कसा करावा
उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (IIIT), पुणे सर्व्हे नं.९/१२/२, आंबेगाव बुद्रुक, सिंहगड इन्स्टिट्यूट रोड, पुणे – ४१११०४१, महाराष्ट्र
नोकरीच्या संधीसाठी खात्रीचे माध्यम : khabarbat.com
निवेदन : khabarbat.com या पोर्टलवर नोकरी विषयक संधीची माहिती दिली जात असते. आपल्यापैकी अनेक गरजू, इच्छुकांना त्याचा फायदा घेता यावा यासाठी हा प्रयत्न आहे. नोकरी विषयक अन्य कोणत्याही बाबींना khabarbat.com किंवा मुख्य संपादक जबाबदार नाहीत, याची नोंद घ्यावी.