भारतीय म्युच्युअल फंड (MF) उद्योगातील (AUM) व्यवस्थापनाखालील मालमत्ता ५० लाख कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे. AUM वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे शेअर बाजारातील वाढ आणि फंडांच्या गुंतवणुकीत सातत्याने झालेली वाढ होय.
असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड ऑफ इंडियाच्या उपलब्ध आकडेवारीनुसार, डिसेंबरमध्ये ओपन-एंडेड स्कीम्स अंतर्गत व्यवस्थापनाखालील एकूण मालमत्ता ५०.८० लाख कोटी रुपये होती, तर नोव्हेंबर २०२३ मध्ये हा आकडा ४८.७८ लाख कोटी रुपये होता.
गेल्या वर्षी शेअर बाजारातील प्रचंड वाढीचा परिणाम म्युच्युअल फंड (MF) उद्योगाच्या मालमत्तेवर दिसून येत आहे. डिसेंबर २०२३ मध्ये सेन्सेक्स ७.५३ टक्क्यांनी वाढला, तर निफ्टी निर्देशांक ७.९३ टक्क्यांनी वाढला. दरम्यान, सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) मधील गुंतवणूक डिसेंबरमध्ये वाढून १७,६१० कोटी झाली आहे.