मिकी माऊस आणि मिनी माऊस ही १०० वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेली कार्टून पात्रे अद्याप लोकप्रिय आहेत. आता ही पात्रे ‘कॉपीराइट’च्या बंधनातून मुक्त झाली आहेत. अमेरिकेतील कायद्यानुसार ‘डिस्रे’च्या या लाडक्या पात्रांवरील खासगी हक्क संपुष्टात आला. आता त्यांचा इतरांनाही वापर करता येणार आहे.
‘डिस्रे’ने १९२८ मध्ये ‘स्टीमबोट विली’ या लघुपटाद्वारे मिकी माऊस आणि मिनी माऊस ही पात्रे सर्वप्रथम सादर केली. त्यानंतर हे पात्र प्रचंड लोकप्रिय ठरले. हे पात्र ‘डिस्रे’चा ब्रँड बनले. त्यांचे अनेक कार्यक्रम आणि कार्टूनपट हे मिकी माऊसलाच केंद्रस्थानी ठेवून निर्माण झाले होते. या दोन्ही पात्रांची ही पहिली आवृत्ती मागील महिन्यात, म्हणजे ९५ वर्षांनंतर ‘कॉपीराइट’मधून मुक्त झाली आहेत.
मिकी माऊसप्रमाणेच या वर्षी एक तारखेपासून ओरलँडो (कंपनी- व्हर्जिनिया वूल्फ), पीटर पॅन (जे. एम. बॅरी) आणि ‘विनी द पूह’ या पात्राचा मित्र ‘टिगर’ ही पात्रे देखील ‘कॉपीराइट’मधून मुक्त झाली आहेत. विनी द पूह हे पात्र २०२२ मध्येच सार्वजनिक वापरासाठी खुले झाले आहे. याशिवाय ‘डिस्रे’चीच ‘प्लुटो’ आणि ‘डोनाल्ड डक’ ही पात्रेही लवकरच बंधनातून मुक्त होणार आहेत.