khabarbat

Advertisement

Union Budget : दोनपेक्षा जास्त मुले असल्यास सरकारी सवलती, पदोन्नती बंद?

दोन पेक्षा जास्त मुले असल्यास संबंधित व्यक्तिला कोणत्याही प्रकारची सबसिडी दिली जाऊ नये. कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ दिला जाऊ नये. पदोन्नती रोखण्यात यावी, अशी मागणी जनतेने ईमेल आणि वेबसाईटच्या माध्यमातून अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांना सूचना केली आहे.

येत्या १ फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन् अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पासंदर्भात लोकांची मते मागवण्यात आली. यावेळी जनतेकडून अनेक सूचना आल्या आहेत. त्यात महत्वाची सूचना म्हणजे दोन पेक्षा जास्त मुले असल्यास सर्वच सवलती रद्द करण्याची आहे.

दोनपेक्षा अधिक मुले असणा-या व्यक्तिला निवडणूक लढवण्यावर बंदी आणावी. तसेच त्याला सरकारचा कोणताही पुरस्कार दिला जाऊ नये. वाहने १५ वर्षांऐवजी २० वर्षांनी स्क्रॅप करण्याची सूचना करण्यात आली.

गृहकर्जावर देण्यात येणारी करातील सूट दोन लाखांवरुन पाच लाख करण्यात यावी. वरिष्ठ नागरिकांना रेल्वेतील सवलत पुन्हा सुरु करा, वरिष्ठ नागरिकांसाठी तीर्थयात्रा योजना करा, तत्काल तिकीट कन्फर्म मिळायला हवे, मुंबई, कोलकोता, बंगळुरु, हैदराबाद, अहमदाबाद शहरात हायस्पीड ट्रेन सुरु करण्याची मागणी देखील केली आहे.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »