मॉर्निंग कन्सल्ट संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या ग्लोबल लीडर (global leader approval) मान्यता यादीमध्ये पंतप्रधान मोदींचे नाव पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर आले आहे. जगभरातील २२ प्रसिद्ध नेत्यांमध्ये पंतप्रधान मोदींना सर्वाधिक ७६ टक्के मते मिळाली.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचेही नाव या यादीमध्ये आहे. अर्थात, यापैकी कोणीही टॉप पाच नेत्यांच्या यादीतही आले नाही.
या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष आंद्रेज मॅन्युएल लोपेज ओब्राडोर (६६% रेटिंग) आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर स्वित्झर्लँडचे राष्ट्राध्यक्ष अॅलन बर्सेट (५८% रेटिंग) आहेत. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लूला डी सिल्वा या ४९% रेटिंगसह चौथ्या क्रमांकावर, तर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज हे ४७% रेटिंगसह पाचव्या क्रमांकावर आहेत.
इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी ४१% रेटिंगसह सहाव्या क्रमांकावर आहेत. तर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन हे आठव्या क्रमांकावर आहेत. जस्टिन ट्रुडो हे तेराव्या, तर ऋषी सुनक १७ व्या क्रमांकावर आहेत. आयर्लँडचे पंतप्रधान लिओ वऱ्हाडकर हे ३६% रेटिंगसह दहाव्या क्रमांकावर आहेत.
आपल्या बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा : 99605 42605