देशातील महिलांना केले आणखी मुले जन्माला घालण्याचे आवाहन
उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन यांची दहशत सर्वांना माहितीच आहे. मात्र, याच किम जोंग यांचा चक्क रडतानाचा एक व्हिडिओ समोर आला. देशातील जन्मदर कमी झाल्यामुळे ते महिलांना आणखी मुले जन्माला घालण्याची विनंती करत होते. त्यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले.
प्योंग्यांग शहरात ‘नॅशनल मदर्स मीटिंग’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी बोलताना (Kim Jong) किम जोंग म्हणाले, “राष्ट्राची ताकद वाढवणे ही महिलांचे देखील कर्तव्य आहे. घसरत असणारा जन्मदर वाढवणे, आणि मुलांचे योग्य संगोपन करणे यासाठी देशातील महिलांसोबत मिळून आपण काम करणे गरजेचे आहे.” यावेळी बोलताना ते भावनिक झाले, आणि रुमालाने त्यांनी अश्रू पुसले.
संयुक्त राष्ट्रांच्या पॉप्युलेशन फंडने दिलेल्या आकडेवारीनुसार, उत्तर कोरियाचा २०२३ मधील फर्टिलिटी रेट हा १.८ टक्के होता. केवळ उत्तर कोरियाच नाही, तर दक्षिण कोरिया आणि जपानमधील जन्मदर देखील कमी झाल्याचे दिसून आले आहे.
या कार्यक्रमावेळी केवळ किम जोंग उनच नव्हे, तर उपस्थित महिलांनाही अश्रू अनावर झाले. समोरील कित्येक महिला आपले डोळे पुसत असल्याचे दिसून आले. अर्थात, हा सगळा एक ठरवून केलेला ‘ड्रामा’ असल्याची टीका या कार्यक्रमावर होत आहे.