khabarbat

khabarbat logo

Join Us

Ram Mandir

Advertisement

Ram Mandir : विराट अन् सचिन राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठापणा कार्यक्रमासाठी अयोध्येला जाणार

 

भारताचे आजी – माजी दिग्गज खेळाडू विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर हे (Ayodhya) अयोध्येतील श्री राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठापणा कार्यक्रमाला उपस्थिती लावण्याची शक्यता आहे. या सोहळ्यास सुमारे ८ हजार मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे.

सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली या दोघांनाही राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठापणा कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आलं आहे.

या दोघांनीही कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली तर क्रिकेट इतिहासात सर्वाधिक शतके ठोकणारे पहिल्या दोन क्रमांकाचे फलंदाज एकाचवेळी एका धार्मिक कार्यक्रमात दिसतील. अयोध्येत राम मंदिराचे निर्माण कार्य जवळपास पूर्ण झाले असून २२ जानेवारी २०२४ रोजी प्राण प्रतिष्ठपणा करून हे मंदिर सर्वांसाठी खुले करण्यात येत आहे.

श्री राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठापणा सोहळ्याला पंतप्रधान (Narendra Modi) नरेंद्र मोदींसह जवळपास ८ हजार पाहुणे देखील उपस्थित राहणार आहेत. यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, सचिन तेंडुलकर, विराट कोहली यासह अनेकांचा समावेश आहे.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »