२०२४ च्या लोकसभा निवडणूकीचे वेध सध्या लागले आहेत. महाराष्ट्रातही सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. राज्यातील ६-७ आमदारांना भाजप लोकसभा निवडणुकीत उतरवेल असे म्हटले जात आहे. महाराष्ट्रातून एकूण ४८ खासदार निवडून येतात. यामुळे महाराष्ट्रात अधिकाधिक खासदार निवडून आणण्यासाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत.
यातच भाजप आपल्या आमदारांना राज्यातून खासदारकीची तिकीट देईल असे म्हटले जात आहे. राज्यातील ६-७ आमदारांना भाजप लोकसभा निवडणुकीत उतरवेल असे म्हटले जात आहे. मध्यप्रदेशमध्ये तीन केंद्रीय मंत्री आणि चार खासदारांना आमदारकीचे तिकीट देऊन भाजपने मोठी खेळी केली.
अशीच खेळी भाजप महाराष्ट्रात खेळेल असे म्हटले जात आहे. फक्त राज्यात त्याचे उलटे होईल असे म्हटले जात आहे. भाजपचे दिग्गज नेते तथा राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार, मंत्री गिरीश महाजन, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, आकाश फुंडकर , राम सातपुते, मंत्री रवींद्र चव्हाण, संजय केळकर यांच्या नावांची सध्या चर्चा आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांनीही लोकसभा निवडणुक लढवावी असा आग्रह भाजपचा असल्याचे म्हटले जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने आपल्या मंत्र्यांना आणि दिग्गज नेत्यांना लोकसभेसाठी संधी द्यावी, असा आग्रह भाजपकडून केला जात आहे.
जाहिरातीचं विश्वसनीय माध्यम : khabarbat.com । Call 99605 42605