कोरोनाच्या काळातील संघर्ष आपण सगळ्यांनी अनुभवला आहे. मात्र आपल्या सुरक्षिततेसाठी ज्या जैव संशोधकांनी आपले सर्वस्व पणाला लावले, ज्या संघर्षाला तोंड दिले. त्याची नोंद फारशी घेतली गेली नाही, ते सारे या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. तेच या चित्रपटाचे बलस्थान आहे. म्हणूनच विवेक अग्निहोत्रींचा (the vaccine war) ‘द व्हॅक्सीन वॉर’ हा सिनेमा सध्या सोशल मिडीयावर चांगलाच चर्चेत आहे.

विवेक अग्निहोत्रींच्या ‘द व्हॅक्सीन वॉर’ (the vaccine war) चे स्पेशल स्क्रिनींग आयोजित करण्यात आले होते.
भारतीय वैज्ञानिक समुदायाचा त्याग आणि यशाने माझे डोके सुन्न झाले. ज्यांनी भारताची पहिली लस बनवली आणि अत्यंत आव्हानात्मक काळात देशाला सुरक्षित ठेवले, असे एका मास्टर स्टोरीटेलरने सांगितले. हा सिनेमा पाहताना तुम्ही एकाच वेळी जयजयकार करता, टाळ्या वाजवता, रडता आणि जल्लोष करता. संपूर्ण कलाकारांचे अभिनय परफॉर्मन्स, आपल्या भारतीय शास्त्रज्ञांचा (स्त्रिया) त्याग आणि धैर्य यांचे योग्य आणि प्रभावशाली चित्रण अतिशय सुंदर आहे. विशेषतः लॉकडाऊन मध्ये आपल्यासाठी ज्या महिलांनी त्याग केलाय, त्यांना सन्मान द्या.” अशी प्रतिक्रिया आर. माधवन या अभिनेत्याने व्यक्त केली.
देशातील डॉक्टरांनी आणि शास्त्रज्ञांनी कोविडच्या काळात कशाप्रकारे काम केले, कोणकोणत्या संघर्षांचा सामना करावा लागला, त्यांनी व्हॅक्सीनची निर्मिती कशी केली याविषयीची मांडणी या चित्रपटातून कऱण्यात आली आहे. द व्हॅक्सीन वॉर (the vaccine war) ही भारतातली पहिली बायो सायन्स फिल्म असल्याचे सांगण्यात येत आहे. या चित्रपटातून भारत बायोटेक आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांच्या प्रवासाविषयी सांगण्यात येणार आहे.
येत्या २८ सप्टेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे