मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांनी रिलायन्स (Reliance) इंडस्ट्रीजमधून राजीनामा दिला आहे. आता त्यांच्या जागी ईशा अंबानीची नियुक्ती करण्यात आली आहे.
RIL बोर्डाने ईशा अंबानी, आकाश अंबानी आणि अनंत अंबानी यांच्या संचालक मंडळावर नियुक्तीची शिफारस केली आहे. नीता अंबानी बोर्डातून पायउतार होणार आहेत. त्या रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षपदी राहतील.
मार्केट कॅपनुसार देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स (Reliance) इंडस्ट्रीजच्या 46 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (एजीएम) अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणाचा संदर्भ देत म्हटले की, नवा भारत कधीच थांबत नाही, कधीच हारत नाही.
रिलायन्स इंडस्ट्रीज आपले घर, पृथ्वी, देश आणि कंपनीच्या सर्व गुंतवणूकदारांची काळजी घेते. नवीन रिलायन्स (Reliance) भारताच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देण्यास कटिबद्ध आहे. RIL चे प्रमुख 46 व्या एजीएम प्रसंगी म्हणाले की, आता वेळ आली आहे जेव्हा उद्योजकांनी एकत्र काम केले पाहिजे जेणेकरुन आपण 2047 पर्यंत भारताला विकसित आणि समृद्ध बनवू शकू.
आरआयएलचे प्रमुख मुकेश अंबानी म्हणाले की, कंपनी जिओसाठी 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. रिलायन्स जिओ हे न्यू इंडियाच्या डिजिटल परिवर्तनाचे प्रतीक आहे.
त्यांची तिन्ही मुले आकाश अंबानी, ईशा अंबानी आणि अनंत अंबानी रिलायन्स (Reliance) इंडस्ट्रीजच्या संचालक मंडळात सामील झाले आहेत, तर नीता अंबानी यांनी कंपनीच्या संचालक मंडळातून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे.
मुकेश अंबानी म्हणाले की, डिसेंबरपासून ग्राहकांना देशातील प्रत्येक भागात 5G सेवा मिळण्यास सुरुवात होईल. Jio ने 2G फीचर फोन पेक्षा कमी किंमतीत फक्त 999 रुपयांमध्ये ‘Jio Bharat’ फोन लॉन्च करून भारतातील प्रत्येक घरात मोबाईल आणि 4G पुरवण्याचे काम केले आहे.