एक दिवसीय विश्व चषक स्पर्धेतील सर्वात हाय व्होल्टेज भारत – पाकिस्तान सामना हा अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यावर दहशतवादी हल्ल्याचे सावट दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर उद्या दिल्लीत महत्वपूर्ण चर्चा होत आहे.
BCCI आणि ICC ने गेल्या महिन्यातच एक दिवसीय विश्व चषक स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले होते. पाकिस्तानने अहमदाबादमधील सामना दुसऱ्या ठिकाणी हलवण्याची मागणी केली होती. मात्र ही मागणी मान्य करण्यात आली नाही.
जरी पाकिस्तानची मागणी BCCI आणि ICC ने धुडकावून लावली असली तरी या सामन्याची तारीख बदलण्याचा सल्ला काही सुरक्षा यंत्रणांनी दिला आहे. यानंतर आता BCCI चे सचिव जय शहा यांनी उद्या (दि. २७ जुलै) नवी दिल्ली येथे पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आहे.
ICC एक दिवसीय विश्व चषक स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणारा सामना हा १५ ऑक्टोबर ऐवजी १४ ऑक्टोबरला होण्याची शक्यता आहे. सुरक्षा यंत्रणांनी BCCI ला भारत – पाकिस्तान हा सामन्याची तारीख बदलावी अशी विनंती केली आहे. हा सामना १५ ऑक्टोबर रोजी होणार आहे. हा नवरात्रीचा पहिला दिवस आहे त्यामुळे गुजरातमध्ये प्रचंड गर्दी असते, ही बा लक्षात घेता घातपाती घटना टाळण्याच्या हेतूने बदल करण्यात येत आहे.