आसाम, मिझोरामला झळ
म्यानमार सीमेजवळील मणिपूरमधील मोरे गावात घरांची जाळपोळ आणि गोळीबार करण्यात आला. येथे कुकी आणि मैतेई या दोन्ही समाजाचे लोक राहतात. मणिपूरमधील हिंसाचारानंतर ईशान्येकडील इतर राज्येही जातीय हिंसाचाराच्या तडाख्यात आली आहेत.
आता आसाम आणि मणिपूरच्या विद्यार्थी संघटनेने मिझो लोकांना आसामच्या बराक खोऱ्यातून बाहेर पडण्याचा सल्ला दिला.
कांगपोकपी जिल्ह्यात जमावाने सुरक्षा दलाच्या दोन बस जाळल्या. .
कुकीच्या समर्थनार्थ रॅली
मिझोराममध्ये कुकी समुदायाच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या रॅलीत हजारो लोक सहभागी झाले. मुख्यमंत्री झोरामथांगा यांनी सरकारी कार्यालयेही बंद ठेवण्याचे आदेश दिले. लोकांनी मणिपूरच्या लोकांसाठी कपडेही दान केले.
महाराष्ट्रातून मणिपूरला कांदा
मध्य रेल्वेने नाशिक येथून कांद्याच्या ६ वॅगन मणिपूरला पाठवल्या. मणिपूरमध्ये जातीय हिंसाचारामुळे कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे, त्यामुळे राज्यात जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा आहे. उत्तर-पूर्व सीमावर्ती रेल्वेने राज्य परिवहन विभागाच्या मदतीने मणिपूरला जीवनावश्यक वस्तूंची पहिली मालगाडी पाठवली होती.