khabarbat

khabarbat logo

Join Us

Advertisement

महाविनाशक ओपेनहाइमर, रिलीजपूर्वीच हाऊसफुल्ल

Robert Oppenheimer : ‘Father of the atomic bomb’
Robert Oppenheimer : ‘Father of the atomic bomb’

अलीकडच्या काही वर्षांत चित्रपट गृहाच्या तिकीट खिडकीवर ना हाऊस फुल्लचा बोर्ड दिसला, ना ऍडव्हान्स बुकिंगची रांग. मात्र अपवाद ठरला तो ‘बाईपण भारी देवा’चा!

आता चर्चा आहे ती, ‘ओपेनहाइमर’ (Oppenheimer) या हॉलिवूड (Hollywood) पटाची. ठाणे, मुंबई, दिल्लीत या चित्रपटाची जबरदस्त क्रेझ पाहायला मिळाली.

‘ओपेनहाइमर’ हा सिनेमा उद्या २१ जुलैला जगभरातील सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे. मात्र यापूर्वीच भारतीय बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने चांगलाच गल्ला जमवला. भारतात ऍडव्हान्स बुकिंगमध्येच आजवर ९० हजार तिकीट विकले गेले. प्रदर्शनापूर्वीच सिनेमाचे १ लाख २० हजार तिकीटे विकली जाऊ शकतात, अशी शक्यता आहे. मुंबई-दिल्लीत तर ‘ओपेनहाइमर’चे शो हाऊसफुल्ल आहेत.

दिग्दर्शक क्रिस्टोफर नोलनने (Christopher Nolan) या सिनेमाची धुरा सांभाळली आहे. उल्लेखनीय म्हणजे अमेरिकी भौतिकशास्त्रज्ञ जे. रॉबर्ट ओपेनहाइमर (Robbert Oppenheimer) यांच्या आयुष्यावर बेतलेला हा चित्रपट असून हॉलिवूड अभिनेता सिलियन मर्फीने (Cillian Murphy) जे. रॉबर्ट यांची भूमिका साकारली आहे.

‘टेनेट’, ‘द डार्क नाइट राइजेस’, ‘इंटरस्टेलर’, ‘इन्सेप्शन’, अशा त्याच्या अनेक सिनेमांचा येथे उल्लेख करता येईल.

‘ओपेनहाइमर’चा ठाण्यात २० जुलै रोजी रात्री ११.५९ वाजता खास शो आहे. मुंबई-दिल्लीत अनेक थिएटरमध्ये पहाटे तीन वाजताही ‘ओपेनहाइमर’चे शो सुरु होत आहेत.

Oppenheimer
Oppenheimer

‘ओपनहाइमर’ या सिनेमाच्या तिकीटांची किंमत सध्या दोन हजार पाचशे रुपये आहे; आणि सध्यातरी वीकेंडपर्यंतचे सारे शो हाऊसफुल्ल आहेत.

या ठिकाणी आवर्जून नमूद करण्यासारखी बाब म्हणजे, या चित्रपटावर भगवद्गीतेचा प्रभाव ठळकपणे दिसतो. तसा रॉबर्ट ओपेनहाइमर यांच्यावर तो होताच. अभिनेता सिलियन मर्फीने म्हटले कि, “ओपेनहायमर’ माझ्यासाठी खासच आहे. त्याच्या निर्मिती काळात मी भगवद्गीतेचे पठण केले आहे. भगवद्गीतेचे पठण केल्याने मला प्रेरणा मिळाली.

कोण आहेत ओपेनहायमर ? ( J. Robert Oppenheimer)

दुसऱ्या जागतिक महायुद्धात वापरलेल्या अणुबॉम्बचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शास्त्रज्ञांपैकी रॉबर्ट ओपेनहायमर हे एक. ते ज्यू वंशाचे अमेरिकी भौतिकशास्त्रज्ञ. आण्विक शस्त्रास्त्रे विकसित करण्याचे उद्दिष्ट असलेल्या मॅनहटन प्रकल्पाचे ते प्रमुख होते.

रॉबर्ट ओपेनहायमर यांच्यावर भगवद्गीतेचा दांडगा प्रभाव होता. भगवद्गीता समजून घेण्यासाठी ते स्वतः संस्कृत शिकले. अणुबॉम्बच्या चाचणीनंतरच्या काळात त्यांनी भगवद्गीतेचे बरेच दाखले दिल्याचे आजही सांगितले जाते.

१६ जुलै १९४५ रोजी अणुबॉम्बची चाचणी यशस्वी झाली आणि रॉबर्ट ओपेनहायमर यांना भगवद्गीतेमधील ‘श्री भगवानुवाच, कालोऽस्मि लोकक्षयकृत्प्रवृद्धो लोकान्समाहर्तुमिह प्रवृत्तः। ऋतेऽपि त्वां न भविष्यन्ति सर्वे येऽवस्थिताः प्रत्यनीकेषु योधाः।।’ या श्लोकाचा अर्थ ध्यानात आला.

भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात, ‘या विश्वाचा नाश करणारा मी काळ आहे, आता मी अधर्माचा विनाश करण्यासाठी आलो आहे.’

अणुबाँबच्या या शोधाने अवघ्या जगाचे आर्थिक आणि राजकीय समीकरणे बदलली. अमेरिकेने हिरोशिमा आणि नागासाकी ही शहरे बेचिराख केली. आजही जगावर अणुबाँबचे संकट कायम आहे. सारे जग त्याच्या दडपणाखाली आहे.

ओपेनहाइमर या चित्रपटाचा हिंदीतील ट्रेलर येथे पाहू शकता …

 

ताज्या अपडेटसाठी वाचत राहा : khabarbat.com

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

ताज्या बातम्या

Translate »