भारतीय स्टेट बँकेने (SBI) आपल्या फ्लोटिंग व्याजदरावरील MCLR मध्ये आजपासून (१५ जुलै) वाढ केली. यामुळे कर्जावरील व्याज महाग झाले. परिणामी घर, वाहन खरेदीचे स्वप्न पाहणाऱ्या करोडो ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी MCLR दरात 0.05% वाढ केली. EMI फक्त रीसेट तारखेलाच वाढेल. उल्लेखनीय म्हणजे 3 महिन्यांसाठी MCLR 5 bps ने वाढून 8.15 टक्के झाला आहे. तर 6 महिन्यांचा MCLR वाढून 8.45 टक्के झाला आहे. त्याचप्रमाणे, 2 वर्षांचा MCLR देखील 5 bps ने वाढून 8.65 टक्के झाला आहे. तर तीन वर्षांचा MCLR 8.75 टक्के झाला आहे.
MCLR म्हणजे काय?
MCLR (Marginal Costs of Fund-Based Lending Rate) म्हणजे ग्राहकाने घेतलेल्या कर्जावरील किमान व्याज दर असतो. याआधी कर्जाच्या व्याजासाठी बेस रेट असायचा. मात्र, बँकेचा व्याज दर ठरवण्याची प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने 1 एप्रिल 2016 पासून MCLR ची अमलबजावणी सुरु केली.