राज्यात ३० जूननंतर होणाऱ्या सहकारी संस्थांच्या निवडणुका आता ३० सप्टेंबर नंतर होणार आहेत. सहकार मंत्री अतुल सावे यांनी हा निर्णय जाहिर केला.
राज्यातील ८२ हजार ६३१ सहकारी संस्था निवडणुकीस पात्र आहेत. तसेच ४८ हजार ६६७ संस्थांच्या अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत. राज्यातील ४२ हजार १५७ संस्थांच्या निवडणुका पूर्ण झाल्या असून ६ हजार ५१० संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया सुरु आहे.
पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक ठिकाणी निवडणूक घेणे कठीण आहे. मतदार शेतकरी पेरणीच्या कामात व्यस्त असल्याने मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.