विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या VRS अर्थात स्वेच्छानिवृत्तीनंतर राजकीय वातावरण तापले आहे. सरकारला प्रामाणिक अधिकारी नको आहेत म्हणून केंद्रेकरांना स्वेच्छानिवृत्ती घेण्यास भाग पाडले, असा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. तर, केंद्रेकरांची स्वेच्छानिवृत्ती हा त्यांचा वैयक्तिक विषय असून त्याचा सरकारशी काहीही संबध नाही. विरोधी पक्षाने कुठल्याही गोष्टीचे राजकारण करू नये, असे प्रत्युत्तर पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी दिले. .
विभागीय आयुक्त केंद्रेकर kendrekar यांनी VRS अर्थात स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर त्याचे पडसाद महसूल आणि राजकीय क्षेत्रात उमटत आहेत. महसूल विभागातील आणि मराठवाड्यातील अधिकाऱ्यांना स्वेच्छानिवृत्तीबद्दल आश्चर्य वाटत आहे. दीड-दोन वर्षे सेवा बाकी असताना निवृत्ती घ्यायला नको होती, अशी भूमिकाही अधिकारी खासगीत मांडत आहेत.
शेतकऱ्यांच्या शिफारशीचा परिणाम
दरम्यान, सुनील केंद्रेकर यांनी शेतकऱ्यांच्या केलेल्या शिफारशी सरकारच्या पचनी पडलेल्या नाहीत. प्रत्येक शेतकऱ्याला एकरी १० हजार रुपये मदतीची शिफारस त्यांनी केली होती. त्यामुळे राज्य सरकारने त्यांना VRS अर्थात स्वेच्छानिवृत्ती घेण्यास भाग पाडले असा आरोप अंबादास दानवे यांनी केला.
मराठवाड्याच्या प्रश्नांवर भांडणारे अधिकारी
याबाबत खा. इम्तियाज जलील म्हणाले की, मराठवाड्याच्या प्रश्नांवर केंद्रेकर kendrekar भांडणारे अधिकारी आहेत. ते मराठवाड्याच्या प्रश्नांबाबत सचिव पातळीवर वाद देखील घालत होते. माझाही त्यांच्याशी एकदा वाद झाला होता. मात्र, मला त्यांच्या कामाबद्दल कायम आदरच आहे. त्यांना अशा पद्धतीने निवृत्ती घ्यायला भाग पाडणे चुकीचे आहे.