khabarbat

bsnl

Advertisement

  • Advertise with khabarbat.com

BSNL पुण्यातील जागांची विक्री करणार

‘भारत संचार निगम लिमिटेड’च्या (BSNL) कर्मचाऱ्यांच्या स्वेच्छानिवृत्तीनंतर पुढचा टप्पा म्हणून वापरामध्ये नसलेल्या जमिनींची विक्री करण्यात येणार आहे. त्यात पुण्यातील वापरात नसलेल्या २२ जागांचा समावेश आहे. लोणावळा, गुलटेकडी आणि घोरपडी येथील अशा तीन जागा विक्रीसाठी निश्चित करण्यात आल्या आहेत.

आर्थिक दुरवस्थेतून बाहेर आलेल्या ‘बीएसएनएल’ला येत्या पाच वर्षांमध्ये निव्वळ नफ्यामध्ये आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. गेल्या तीन वर्षांपासून ‘बीएसएनएल’ला परिचालनात्मक नफा होत आहे. पहिल्या टप्प्यात २०२० मध्ये कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्ती योजना जाहीर केली होती.

आता दुसऱ्या टप्प्यामध्ये देशभरातील विविध राज्यांमधील सध्या वापरात नसलेल्या BSNL बीएसएनएलच्या १५ हजार जमिनीची विक्री करण्यात येणार आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात दोन हजार जमिनींची विक्री करण्यात येणार आहे. सर्वाधिक जमिनी महाराष्ट्रात असून या सगळ्या विक्रीतून साधारण १० हजार कोटी रुपये उत्पन्न मिळू शकेल. महाराष्ट्रात वापरात नसलेल्या ८० जागा आहेत. पुण्यामध्ये वापरात नसलेल्या २२ जागा आहेत. लोणावळा, गुलटेकडी आणि घोरपडी येथील अशा तीन जागा विक्रीसाठी निश्चित केल्याची माहिती ‘बीएसएनएल’च्या मनुष्यबळ विकास विभागाचे संचालक अरविंद वडनेरकर यांनी दिली.

विलीनीकरणाचा निर्णय नाही

MTNL आणि BSNL यांच्या विलीनीकरणाबद्दल सध्या कोणताही निर्णय झालेला नाही. ‘एमटीएनएल’वर सध्या २९ हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. अशा परिस्थितीत ‘बीएसएनएल’मध्ये विलीनीकरण केल्यास ते कर्ज फेडण्याची आमची क्षमता नाही, असेही अरविंद वडनेरकर यांनी सांगितले.

आपल्या गावची बातमी वाचा : khabarbat.com

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »