khabarbat

IT working womens

Advertisement

  • Advertise with khabarbat.com

वर्कलोडमुळे IT महिलांची नोकरीकडे पाठ

देशातील सर्वात मोठ्या मानल्या जाणाऱ्या TCS या IT कंपनीचा ताजा अहवाल पाहता पुरुषांच्या तुलनेत महिला कर्मचाऱ्यांचे नोकरी सोडण्याचे प्रमाण अधिक असल्याचे जाणवते. कंपनीचे मुख्य मनुष्यबळ विकास अधिकारी मिलिंद लक्कड यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना काळात Work from Home करणाऱ्या महिला कर्मचारी घरच्या कामात इतक्या गुंतल्या की, परिस्थिती पूर्ववत झाल्यानंतरही त्या कामावर पुन्हा रुजू होऊ शकल्या नाहीत.

अर्थातच या समस्येला तोंड देणारी टीएसएस ही कंपनी एकटी नाही. बंगळुरू येथील एका आयटी प्रकाशन फर्मनुसार २०२३ मध्ये नोकरी सोडणाऱ्यांमध्ये ५०% पेक्षा जास्त प्रमाण महिलांचे आहे. कंपनीचे एक्झिक्युटिव्ह म्हणाले, नवीन माता आणि नवविवाहितांनी वाढत्या घरगुती जबाबदाऱ्यांमुळे नोकरीसाठी असमर्थता व्यक्त केली.

महिलांचे नोकरी सोडण्याचे प्रमाण हे मध्य-व्यवस्थापन आणि मध्य-करिअर स्तरावर नेहमीच खूप जास्त राहिले आहेत. आता त्यात आणखी वाढ झाली आहे, असे टीमलीजच्या सहसंस्थापक ऋतुपर्णा चक्रवर्ती म्हणाल्या.

कोरोनाच्या काळात करिअरच्या मधोमध असलेल्या कर्मचाऱ्यांची घरगुती व्यवस्था वर्क फ्रॉम होमनुसार झाली आहे. म्हणूनच कोरोनानंतर कंपन्यांनी कार्यालयीन कामासाठी दबाव टाकला तेव्हा मोठ्या प्रमाणात महिला कर्मचारी नोकरीतून बाहेर पडल्या. ३०-४० वयोगटात १५% ची कमाल घट दिसून आली आहे.

टीमलिज एचआरटेकचे सीईओ आसुमीत सभरवाल म्हणाले, जागतिक टेक कंपन्यांनी जेंडर विविधता सुधारण्यासाठी एआयने सक्षम एच आर टेक प्लॅटफॉर्मचा वापर सुरू केला. यामुळे टियर २ आणि टियर ३ शहरांमधील महिलांना नोकरीवर ठेवण्यासाठी आणि त्यांना कायम करण्यात खूप मदत झाली.

इन्फोसिसमध्ये सलग ३ वर्षे वाढ
तथापि, इन्फोसिसच्या अहवालानुसार २०१९-२० आणि २०२१-२२ दरम्यान महिला कर्मचाऱ्यांत वाढ झाली. २०१९-२० मध्ये ३७.८%, २०२०-२१ मध्ये ३८.६% , २०२१-२२ मध्ये ३९.६% वाढ झाली. २०२२-२३ मध्ये ही वाढ ३९..४% होती. एफएमसीजी कंपनी नेस्लेचे प्रवक्ता म्हणाले, आमच्या कंपनीत महिलांची संख्या वाढत आहे. आयटी सेवा महिला कर्मचाऱ्यांत अव्वल आहे.

फ्रेश अपडेटसाठी; वाचत राहा khabarbat.com

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »