‘द केरळ स्टोरी’ या सिनेमानंतर आता ‘७२ हुरैन’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ब्रेनवॉश करुन निष्पाप लोकांना दहशतवादी संघटनेत कसे सामील करुन घेतले जाते यावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाच्या ट्रेलरवर अनेक प्रश्न उपस्थित केल्यानंतरही सिनेमाचा ट्रेलर डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आला आहे.
‘७२ हुरैन’ या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये निष्पाप लोकांचे ब्रेनवॉश करून त्यांना दहशतवादी संघटनेमध्ये कसे सामील केले जाते हे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते लोकप्रिय दिग्दर्शक संजय पूरन सिंह यांनी 72 Hoorain या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. ‘७२ हुरैन’ या सिनेमाची घोषणा झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे. या सिनेमाच्या पोस्टरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
१० भाषांमध्ये ‘७२ हुरैन’
हा चित्रपट १० भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ७२ तरुण मुलींचे ब्रेनवॉश करुन त्यांना कसे मारले जाते हे पाहताना अंगावर शहारे येतात. हा सिनेमा इंग्लिश, मराठी, तामिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड, बंगाली, पंजाबी, भोजपुरी, कश्मीरी आणि आसामी या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
‘७२ हुरैन’चा विषय गंभीर असल्यामुळे हा सिनेमा १० भाषांमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. कोणाच्या भावना दुखावण्याचा आमचा हेतू नसून वास्तवाची जाणीव करून देणा-या या सिनेमाची निर्मिती करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे निर्माते म्हणाले.
72 Hoorain या चित्रपटाचा ट्रेलर….