पार्टनरसोबत रोमान्स करण्याचे फॅड वरचेवर वाढत चालले आहे. रोमान्सच्या वेळी काही जोडप्यांना लव्ह बाईट द्यायला आवडते. आपल्या पार्टनरला लव्ह बाईट देऊन एक आठवण ठेवण्याचा प्रयत्न जोडपे करतात. विशेष म्हणजे नवरा-बायकोतही असे लव्ह बाईट बघायला मिळतात.
परंतु, मेक्सिको शहरात असे काही लव्ह बाईट एका तरुणीने तिच्या बॉयफ्रेंडला दिले की, त्याचा जीवच गेला. मॅक्सिकोमध्ये घडलेल्या या घटनेची आजही लोक चर्चा करतात. गर्ल फ्रेंडने लव्ह बाईट दिल्यानंतर त्या तरुणाला झटका आला. तिने जोरात लव्ह बाईट दिल्याने बॉयफ्रेंडच्या रक्त वाहिनीत गाठ तयार झाली, त्यातच त्याचा मृत्यू झाला.
लव्ह बाईटने त्रास झाल्याच्या अशा अनेक घडना घडल्या आहेत. लव्ह बाईटच्या जागी जखम होऊन ती चिघळलेल्या घटना घडल्या. माणसाच्या दातामध्ये असलेल्या घटकांमुळे विषबाधा होऊ शकते. मुळात लव्ह बाईटमुळे त्वचेवर खूप दिवस व्रण राहतो. शिवाय लव्ह बाईटमुळे त्वचारोग होण्याचा धोका असतो.