युक्रेन युद्धादरम्यान रशियासमोर वेगळंच संकट उभे ठाकले आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांच्या विशेष मर्जीतील ‘वॅगनर ग्रुप’ने बंड पुकारल्याची माहिती समोर आली आहे. युक्रेन युद्धादरम्यान वॅगनर ग्रुपचा म्होरक्या येवगनी प्रिगोझिन आणि पुतीन यांच्यातील वाद टोकाला पोहोचला आहे.

खासगी सैनिकांचा गट असलेल्या वॅगनर ग्रुपच्या बंडानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादीमीर पुतीन यांचे कार्यालय असलेल्या क्रेमलिन परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली. वॅगनर ग्रुप लष्करी बळाचा वापर करुन सत्ता उलथवून टाकण्याची पुतीन यांना भीती वाटत आहे. या पार्श्वभूमीवर मॉस्कोच्या अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात सैनिक तैनात करण्यात आले आहेत.
रशियाने आपल्याच भाडोत्री सैनिकांवर बंडखोरीचे गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे रशियन सैनिकांना सध्या युक्रेनच्या लष्करासोबतच पुतिन यांनी युक्रेन विरुद्धच्या युध्दात लढण्याकरिता बोलवलेल्या ‘वॅगनर ग्रुप’च्या भाडोत्री सैन्याचा देखील सामना करावा लागत आहे.
मोठ्या प्रमाणात वाढलेल्या अंतर्गत संघर्षादरम्यान वॅगनर ग्रुपचे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन यांच्यावर सशस्त्र बंडखोरी करण्याचे आवाहन केल्याचा आरोप रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी केला. प्रिगोझन यांनी शनिवारी सांगितले की, त्यांचे सैनिक युक्रेनमधून रशियाच्या हद्दीत घुसले आहेत आणि रशियन सैन्याविरोधात कोणत्याही मर्यादा गाठण्यास तयार आहेत. यानंतर तणाव शिगेला पोहचला.
वॅगनर ग्रुपचा म्होरक्या प्रिगोझिन आणि रशियन सैन्याचे वरिष्ठ अधिकारी यांच्यात दिर्घकाळापासून चाललेल्या संघर्षाने [अखेर टोक गाठले आहे. रशियाच्या एफएसबी सुरक्षा सेवेने प्रिगोझिन विरोधात फौजदारी खटला सुरू केला असून वॅगनर प्रायव्हेट मिलिटरी कंपनी फोर्सेसना येवगेनी प्रिगोझिनच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून त्याला अटक करण्यास सांगितले आहे. क्रेमलिनने प्रीगोझिनवर सशस्त्र बंड पुकारल्याचा आरोप केल्यानंतर लगेचच हे पाऊल उचलण्यात आले.
दरम्यान सध्या भाड्याचे सैनिक नियंत्रणाबाहेर गेले आहेत. मागील काही दिवसांपासून युक्रेन युध्दात वॅगनर ग्रुपचे नाव सतत पुढे येत आहे. येवगेनी प्रिगोझिन याच्या नेतृत्वखालील या ग्रुपला मोठे नुकसान सहन करावे लागले. बखमुत येथील संघर्षात त्यांनी मोठ्या प्रमाणात सैनिक गमावले होते.
तसेच प्रिगोझिन यांनी यापूर्वी सोशल मीडियावर युक्रेनच्या अनेक शहरांवर त्यांनी एकट्यानेच ताबा मिळवल्याचा दावा केल्याचा दावा केला. तसेच यामध्ये रशियन सेनेने त्यांची कुठलीही मदत केली नसल्याचे देखील म्हटले. तसेच त्यांनी संरक्षण मंत्री सग्रेई शोइगु आणि रशियाचे वरिष्ठ जनरल वालेरी गेरासिमोव अकार्यक्षम असल्याचा आरोप केला. प्रिगोझिनने रशियना नागरिकांना देखील त्याच्या सैन्यात सामिल होण्याचे तसेच रशियन सैन्याचे नेतृत्व करणाऱ्यांना शिक्षा देण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले.
khabarbat.com वर जाहिरात, म्हणजे फायद्याचा वायदा !