
बॉलिवूडच्या बादशहाची लेक सुहाना आता शेतकरी बनलीय. खरे तर ही बातमी ऐकायला आणि वाचायला पण गम्मत वाटत असेल… द आर्चिस सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या सुहाना खान बद्दल एक मोठी अपडेट समोर आलीय. ती म्हणजे सुहाना आता शेतकरी बनणार आहे. सुहानाने अलीबाग जवळील थळ या गावात ही शेती घेतली आहे. या शेत जमिनीचे क्षेत्रफळ दीड एकर असल्याचे सांगितले जाते.

सुहानाने शेतीसाठी खरेदी केलेल्या दीड एकर जमीनीची किंमत १२ कोटी ९१ लाख रुपये आहे. या जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहाराशी संबंधित नोंदणीही १ जून रोजी झाली. सुहानाने ७७ लाख ४६ हजार रुपये प्रॉपर्टी टॅक्स जमा केला. अंजली, रेखा आणि प्रिया या तीन बहिणींकडून ही मूळ जमीन खरेदी करण्यात आली.
सुहानाच्या बॉलीवूड करिअरबद्दल बोलायचे झाले तर, प्रेक्षक तिच्या बॉलिवूड डेब्यूची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते. सुहानाचा पहिला चित्रपट The Archies आता Netflix वर प्रदर्शित होणार आहे. अलीकडेच या चित्रपटाचा ट्रेलर समोर आला. द आर्चीजमधून सुहाना खान व्यतिरिक्त बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरची बहीण खुशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांची नात अगस्त्य नंदा देखील पदार्पण करत आहे.
वाचा khabarbat.com : रहा अपडेट