नवी दिल्ली : देशभरात यंदा होळी मोठ्या धुमधडाक्यात साजरी झाली. दिल्लीत होळीच्या दिवशी (liquor sale) दारु विक्रीने मागचे सर्व रेकॉर्ड तोडले. ६ मार्च रोजी एकाच दिवशी ५८.८ कोटी रुपयांची २६ लाख बाटल्या दारुची विक्री झाली.
अबकारी विभागाने या महिन्यात २२७ कोटी रुपयांची दारू विक्री झाली. एकंदर १.१३ कोटी दारुच्या बाटल्या विकल्या. दिल्लीत सध्या ५६० दारुची दुकाने आहेत. इतर दिवशी दररोज १२ ते १३ लाख दारुच्या बाटल्या विकल्या जातात. होळी निमित्त शनिवार, रविवार आणि सोमवारी दारुच्या विक्रीच्या (liquor sale) आकड्यांमध्ये वाढ होत राहिली. सुमारे १५ लाख, २२ लाख आणि २६ लाख इतपत दररोजची विक्री पोहोचली.
यावर्षी दिल्लीने दारुच्या विक्रीतून ६,१०० कोटी रुपयांचा महसूल मिळवला. या महसुलात दारुच्या बाटल्यांवरील उत्पादन शुल्क ५,००० कोटी रुपये आणि व्हॅटच्या रुपात १,१०० कोटी रुपयांचा समावेश आहे. तर ९६० हॉटेल्स, रेस्तराँ आणि क्लब्समध्ये दारुच्या विक्रीमुळे जमा झालेल्या महसुलाच्या डेटाचा समावेश नाही.
whisky, vodka, scotch
दिल्लीतील दारुच्या दुकानदारांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकांनी जास्त करुन व्हिस्की, व्होडका आणि स्कॉच या दारुच्या प्रकारांची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली. वातावरणात उष्णता असल्याने काही जणांनी बिअर देखील खरेदी केल्या. बहुतेक जणांनी ४०० ते १००० रुपयांपर्यंतच्या दारुची खरेदी केली. खूपच महाग असलेल्या दारुची जास्त विक्री झालेली नाही.