औरंगाबाद : येत्या ६ मार्च पर्यंत हवामान खराब राहणार आहे. ५ आणि ६ मार्चला महाराष्ट्रात सर्वदूर पावसाची शक्यता आहे.

येत्या ५ मार्च दरम्यान उत्तर महाराष्ट्रात विशेषतः नाशिक, शिर्डी, संगमनेर, अहमदनगर या जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस होईल. साधारणपणे १ इंच पाऊसमान असेल. अशी माहिती शेतकऱ्याचे हवामान तज्ञ पंजाबराव डक यांनी दिली. त्यांनी वर्तवलेल्या हवामान अंदाजाला शेतकरी वर्गात मोठी मान्यता आणि महत्व आहे.
शेतकऱ्यानी सध्या काढणीची कामे लवकर उरकून घ्यावीत. सर्वत्र गहू आणि हरभरा काढणीला आला आहे. होळीच्या अगोदर हे काम आटोपून घ्यावे, असा सल्ला त्यांनी दिला.
उत्तर महाराष्ट्रासोबतच मराठवाडा, प. विदर्भात हलका-मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार असेही ते म्हणाले. या अवकाळी पावसाची सुरुवात नाशिक, अहमदनगर जिल्ह्यातून होण्याची शक्यता आहे.
दरवर्षी धुळीचा शिडकावा होतच आहे, त्यामुळे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यानी आत्ताच खबरदारी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.