औरंगाबाद : अलीकडच्या धकाधकीच्या दैनंदिन धबडग्यात मुलींना शालेय वयातच पहिली पाळी येत आहे. जी अनेकांना त्रासदायक वाटत आहे. मात्र महाराष्ट्रासह भारतात विविध पारंपारिक पद्धतीने पहिल्या-वहिल्या पाळीचे कौटुंबिक स्वागत केले जाते. हे तितकेच खरे. पालकांनी आपल्या मुला-मुलींचे संगोपन करीत असतानाच या विषयाच्या अनुषंगाने समुपदेशन करणे अगत्याचे ठरत आहे.

काही लोकांना आजही पीरियड्सवर मोकळेपणाने बोलायला संकोच वाटतो. तसेच बहुतेक घरी मुलींना पीरियड्सदरम्यान अनेक गोष्टींवर बंधने लागू केली जातात. मात्र जगात अशी काही ठिकाणे, देश आहेत; जिथे पीरियड्सशी संबंधीत अनेक वेगवेगळ्या प्रथांचे पालन केले जाते.
जगातील अशा काही खास ठिकाणांविषयी पालकांना ओळख करून देत आहोत. जिथे मुलींना पहिल्यांदा पीरियड्स आल्यावर जल्लोष साजरा केला जातो.
जपान
तुम्हाला आश्चर्य वाटेल की, पीरियड्स विषयी जपानमध्ये एक खास प्रथा आहे. पीरियड्सला एका पवित्र दृष्टिकोनातून आणि नजरेने पाहिले जाते.
जपानमध्ये मुलींना पहिल्यांदा पीरियड्स आल्यानंतर मुलीची आई लाल तांदळाचा भात बनवते आणि या भातामध्ये बीन्स, तिळ आणि शेंगदाणे मिक्स केले जातात. संपुर्ण कुटूंब या डिशचा आस्वाद घेते.
इटली
इटलीमध्ये मुलीला पहिल्यांदा पीरियड्स आल्यावर तिला ‘Signora’ म्हणजेच (यंग लेडी) नवतरुणी म्हटले जाते आणि लोक तिला शुभेच्छा देत जल्लोष साजरा करतात. या दिवसाला शुभ दिवस मानला जातो.
ब्राझील
ब्राझीलमध्ये जर घरी कोणत्याही मुलीला पीरियड्स आले तर खूप खास प्रकारे या क्षणाला सेलिब्रेट केले जाते. येथे पीरियड्सविषयी नातेवाईक आणि मित्रमंडळींना सांगितले जाते. या प्रथेत घरचे सर्व पुरुषही सहभागी होतात आणि जल्लोषात साजरा होतात.
ब्राजीलमध्ये हा दिवस फक्त मुलीसाठी नाही तर घरच्या लोकांसाठीही तितकाच महत्त्वाचा, आनंददायी असतो.
फिलीपीन्स
फिलीपीन्समध्ये पीरियड्ससंबंधीत एक अनोखी प्रथा आहे. पहिल्यांदा ज्या मुलीला पीरियड्स येतात त्या मुलीची आई मुलीचे कपडे धुते. फिलीपीन्समध्ये अशीही मान्यता आहे की पीरियड्स आल्यानंतर मुलीला तीन पायऱ्यांवरुन उडी मारायची असते.
याचा अर्थ तीन दिवस ती याच अवस्थेत असणार. फिलीपीन्समध्ये मुलीच्या पहिल्या पीरियड्सनंतर एकमेकांना शुभेच्छा देतात.