सनिव्हेल (कॅलिफोर्निया) : Google पाठोपाठ आता Yahoo या टेक कंपनीनेही कर्मचारी कपात घोषित केली आहे. कंपनी २० टक्क्यांहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करू शकते, असे सांगितले जात आहे.

१,६०० कर्मचाऱ्यांना नारळ
Yahoo आपल्या एकूण कर्मचार्यांपैकी २० % पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नारळ देऊ शकते. अहवालानुसार, या कपातीमुळे Yahoo च्या ५० % पेक्षा जास्त ad- tech कर्मचाऱ्यांवर परिणाम होईल. याचा परिणाम १,६०० पेक्षाही अधिक लोकांवर होणार आहे.
याहूमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गुरुवारी (९ फेब्रुवारी) सांगण्यात आले होते की, कंपनीतील १२ टक्के म्हणजेच १ हजार कर्मचाऱ्यांना कंपनीतून बाहेरचा रस्ता दाखवला जाईल आणि येत्या ६ महिन्यांत कंपनी उर्वरित ८ टक्के म्हणजेच ६०० जणांना सेवामुक्त करेल.