नवी दिल्ली : गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगावरील पहिली स्वदेशी प्रतिबंधक लस याच (फेब्रुवारी) महिन्यात बाजारात दाखल होत आहे. त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. या लसीची किंमत खूपच कमी म्हणजे २००-४०० रुपये असणार आहे. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही लस बाजारात आणणार आहे, अशी माहिती अदर पूनावाला यांनी दिली.

२,००० रुपये प्रति व्हॉयल
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते ही पहिली स्वदेशी ह्युमन पॅपिलोमाव्हायरस (HPV) लस २४ जानेवारी रोजी लॉन्च झाली होती. सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला आणि सिरमचे सरकार आणि नियामक व्यवहार संचालक प्रकाश कुमार सिंह त्यावेळी उपस्थित होते. स्वदेशी दोन डोसच्या HPV लसीची किंमत जी बाजारात २,००० रुपये प्रति व्हॉयल आहे.
Cost of cervical cancer vaccine Cervavac will be between Rs 200-400: Adar Poonawala
Read @ANI Story | https://t.co/llI32LA21s#AdarPoonawala #CancerVaccine #CERVAVAC pic.twitter.com/sYrkkOmd0a
— ANI Digital (@ani_digital) September 1, 2022
भारतात दरवर्षी ३५,००० महिलांचा मृत्यू
भारतामध्ये जगातील १६ टक्के स्त्रिया आहेत. परंतू गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या सर्व घटनांपैकी एक चतुर्थांश आणि जागतिक गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाने होणाऱ्या मृत्यूंपैकी जवळजवळ एक तृतीयांश महिलांचा मृत्यू भारतात होतो. भारतीय महिलांना गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होण्याचा धोका १.६% आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे १% मृत्यूचा धोका आहे. भारतात दरवर्षी जवळपास ८०,००० महिलांना गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होतो आणि ३५,००० महिलांचा मृत्यू होतो.