khabarbat

khabarbat logo

Join Us

Advertisement

पिकवा समुद्राखाली शेती…

शेती क्षेत्रात मोठ्या झपाट्याने बदल होत आहेत. आता चक्क समुद्रात काही फूट खोल पाण्यात शेती केली जात आहे. ‘निमाेज गार्डन’ असे या शेतीचे नाव असून १०० पेक्षा जास्त प्रकारच्या भाज्या आणि फुलांचे उत्पादन घेतले जात आहे.

गेल्या काही वर्षांपासून वातावरणात झालेले बदल, कमी किंवा जास्तीचा पाऊस यासारख्या कारणांमुळे अनेक शेतकरी शेतीपासून लांब जात असतांना कृषी संशोधकांनी केलेल्या नवनवीन तंत्रज्ञानामुळे सुशिक्षित तरुण शेतीकडे वाळू लागला आहे. एरोपॉनिक, हायड्रोपोनिक यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून मर्यादित जागेत फळे आणि भाजीपाला लागवड केला जात आहे. इटलीतील लिग्युरिया भागातील नाेली या गावातील सर्जिओ गॅम्बेरिनी या शेतकऱ्याने तर या पेक्षाही पुढे पाऊल टाकत जगातील पहिली पाण्याखालची शेती केली आहे.

इटलीतील लिग्युरिया भागातील नाेली या गावातील समुद्राच्या पाण्यात काही फूट खाली ही शेती केली जात आहे. ही शेती जगातील पहिली पाण्याखालची शेती ठरली असून सध्या या शेतात १०० पेक्षा अधिक प्रकारच्या भाज्या आणि फुलांचे उत्पादन घेतले जात आहे. समुद्राखाली तापमान स्थिर असते, कार्बन डायऑक्साइड शाेषून घेणे आणि नैसर्गिक पेस्ट कंट्राेल या अनुकूल घटकांमुळे येथे पिकांचा उत्तम विकास हाेताे. या ठिकाणी भाजीपाला हवाबंद वातावरणात पिकवला जाताे. बागेतील सहा अ‍ॅक्रेलिक बायाेम्स समुद्रसपाटीपासून खाली जमिनीवर बांधलेले आहेत आणि दाेन हजार लिटर हवा धारण करतात. या बायाेम्समध्ये ९० प्लँट बसवण्यात आले आहेत. समुद्राचे पाणी घनीभूत हाेऊन या वनस्पतींवर पडते. त्यामुळे त्यांचे पाेषण हाेते. या बागेत पिकवलेल्या भाज्यांमध्ये अधिक पाेषक तत्त्वे आढळून आली आहेत. या शेतीसाठी सुमारे १८ काेटी रुपये खर्च आला असल्याचे गॅम्बेरिनी यांनी सांगितले.

निमोज गार्डन शेतीमध्ये औषधी वनस्पतींसह सॅलड ग्रीन्स, बीन्स आणि स्ट्राॅबेरीसारखी फळेही पिकवली जात आहेत. ही फळे जमिनीवर पिकणाऱ्या फळांच्या तुलनेत अधिक पाैष्टिक असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे समुद्रतटावरील रहिवाशांना देखील पौष्टिक भाज्या, फुले, फळे उपलब्ध होणार आहेत. बेल्जियम आणि फ्लाेरिडात या शेतीसाठी सिमेन्स डिजिटल इंडस्ट्रीजचे साॅफ्टवेअर वापरण्यात आले आहे.

पृथ्वीवरील वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत शेत जमीन कमी होत आहे. अशा वेळी समुद्राखालची शेती ही अन्न पुरवठ्यासाठी आधारभूत ठरू शकते. (सौजन्य : ऍग्रो वर्ल्ड )

तुमच्या उपयोगाची बातमी, khabarbat.com

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like