जैसलमेर : बॉलिवूडचे नवविवाहित दाम्पत्य कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी जैसलमेरच्या ‘सूर्यगढ पॅलेस’मध्ये ७ फेब्रुवारी रोजी शाही पद्धतीने विवाह केला. या दाम्पत्याची Love story शेरशाह चित्रपटाच्या सेटपासून सुरू झाली.
या पॅलेसमध्ये डेस्टिनेशन वेडिंग करण्यासाठी जर एप्रिल ते सप्टेंबर महिन्यात १ कोटी २० लाख रुपये भाडे आकारले जाते. तर ऑक्टोबर ते मार्च महिन्यादरम्यान हा आकडा २ कोटींपर्यंत जातो.
सिद्धार्थने प्रसिद्ध डिजायनर सब्यसाची मुखर्जी यांच्याकडून कियारासाठी मंगळसूत्र बनवून घेतले. कियाराचे मंगळसूत्र दिसण्यास साधे असले तरी त्यांची किंमत मात्र २ कोटी रुपयांच्या जवळपास आहे. या मंगळसूत्राच्यामध्ये मोठे डायमंड देखील आहे.
सूर्यगढ पॅलेस हा जैसलमेर शहरापासून १६ किलोमीटर दूर आणि ६५ एकर परिसरात विस्तारलेला आहे. हा पॅलेस भारतातल्या टॉप १५ वेडिंग डेस्टिनेशन्सपैकी एक आहे.
सिद्धार्थ-कियाराची पहिली भेट ही ‘लस्ट स्टोरीज’ या चित्रपटानिमित्त आयोजित केलेल्या एका पार्टीत झाली. त्यानंतर हळूहळू मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. ‘शेरशाह’ या चित्रपटातील दोघांची केमिस्ट्री चाहत्यांनाही खूप आवडली होती.
२०१० मध्ये करण जोहरने त्याच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून सिद्धार्थला लाँच केलं. कियारा अडवाणीने २०१४ मध्ये ‘फगली’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
तुमच्या उपयोगाची बातमी, khabarbat.com