नवी दिल्ली : इन्फिबीम अव्हेन्यूज लिमिटेड या भारतातील पहिल्या सूचीबद्ध सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म आणि पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने इन्स्टंट ग्लोबल पेटेक प्रा. लि जी गो पेमेंट्स म्हणून कार्यरत आहे, यामध्ये रु. १६ कोटी गुंतवून २.४२% ने समभाग वाढवलेला आहे. या गुंतवणुकीमुळे इन्फिबीम गो पेमेंट्समध्ये ५४.८०% हिस्सा धारण करेल.
गो पेमेंट्स मधील गुंतवणुकीमुळे कंपनीला जलद गती मिळू शकेल, ज्यामुळे इन्फिबीमला उच्च गुंतवणूकीवर परतावा (ROI) मिळेल, तसेच इन्फिबीमच्या समभागधारकांनाही फायदा होईल,” असे इन्फिबीम अव्हेन्यूज लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक विशाल मेहता म्हणाले.
गो पेमेंट्स ही एक वित्तीय तंत्रज्ञान कंपनी आहे जी ग्राहकांना भारतात १०,०००+ पोस्टल कोडमध्ये पॉप शॉप्स किंवा किराणा स्टोअर्स. प्रेषण सेवा, रिचार्ज आणि युटिलिटी बिल पेमेंट सेवा, ट्रॅव्हल बुकिंग, विमा सेवा, आधार बँकिंग सेवा आणि कॅश कलेक्शन सेवा यासारख्या सेवांमध्ये प्रवेश करण्यास सक्षम करणारी सहाय्यक वित्तीय सेवा देते.
भारतात १५ दशलक्षाहून अधिक किराणा (मॉम-अँड-पॉप) स्टोअर्स आहेत, जे लाखो लोकांच्या दैनंदिन गरजांच्या उत्पादनांची सेवा पुरवतात.
“या मॉम-अँड-पॉप (किराणा) स्टोअर्सना अधिक लोक भेट देत असल्याने गो पेमेंट सेवांच्या वापरासाठी अधिक वाढीची क्षमता वाढली आहे, कारण दुकानदार त्यांच्या ग्राहकांना त्यांना पैसे पाठवणे, रिचार्ज आणि इतर सेवा देऊ शकतात,” असे गो पे-मेंट्सचे सीईओ डेकिन क्रिएडो म्हणाले.