khabarbat

khabarbat logo

Join Us

Advertisement

अदानी Forbes चे winner; अंबानी, मस्क पिछाडीवर

नवी दिल्ली : हिंडनबर्गच्या अहवालानंतर कोसळलेल्या अदानी समूहाने दमदार कमबॅक केले आहे. फोर्ब्सच्या विनर लिस्टमध्ये अदानींनी आज अव्वल स्थान गाठले. मुकेश अंबानी, इलॉन मस्क यांनाही धोबीपछाड दिली.

हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या कंपन्यांचे शेअर्स घसरत राहिले. मार्केट कॅप १० दिवसांत तब्बल १०० अब्ज डॉलरपर्यंत घसरला. खुद्द गौतम अदानी यांच्या संपत्तीत मोठी घट नोंदवण्यात आली. २०२३ च्या सुरुवातीच्या आठवड्यात त्यांची संपत्ती १३० अब्ज डॉलरच्या वर होती, १० दिवसांत थेट ५८ अब्ज डॉलरवर येऊन ठेपली. फोर्ब्सच्या रिअल टाईम अब्जाधीशांच्या यादीत अदानी २ व्या क्रमांकावरून २२ व्या क्रमांकावर घसरले, पण अदानींनी आता पुनरागमन केले आहे.

फोर्ब्सच्या लिस्टमध्ये टॉपर
फोर्ब्सच्या बुधवारच्या यादीत गौतम अदानी टॉप गेनर होते, या वेबसाइटने त्यांच्या संपत्तीच्या आधारे जगातील श्रीमंतांची रँकिंग केली. बुधवारी गौतम अदानी यांनी २४ तासांत ४.३ अब्ज डॉलरची कमाई केली. एकूण संपत्ती आता ६४.९ अब्ज डॉलर इतकी झाली आहे.

फोर्ब्सच्या सर्वाधिक गेनच्या यादीत अदानींनंतर इलॉन मस्क दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर Klaus-Michael Kuehne तिसऱ्या क्रमांकावर राहिला.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी चौथ्या क्रमांकावर होते. फोर्ब्सच्या या यादीनुसार लॅरी पेजने सर्वाधिक ६.४ अब्ज डॉलर गमावले.

तुमच्या उपयोगाची बातमी, khabarbat.com
तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »