मुंबई : अनंत अंबानीचा साखरपुडा नुकताच राधिका मर्चंटशी पार पडला. मात्र, त्याच्या साखरपुड्यापेक्षा अनंत अंबानीच्या कोटवरील ‘कार्टियर पैंथर ब्रोच’ (Cartier Brooch) ची चर्चा अधिक रंगली आहे.
अनंतने (anant ambani) यावेळी गडद निळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता. त्याच्या कोटवर ‘कार्टियर पँथर ब्रोच’ लावलेले होते. तर या ब्रोचची चर्चा अधिक रंगली. या ‘कार्टियर पँथर ब्रोच’चा एक इतिहास आहे.’कार्टियर पँथर ब्रोच’ हा प्लॅटिनम किंवा सोन्याच्या धातूत तयार केला जातो. या ब्रोचला हिऱ्यांनी मढवले जाते.
पँथर रोझेट्स काबोचोन कट गोमेद पासून बनवलेला आहे, तर चमकणारे डोळे पाचूचे बनवण्यात आले आहेत.
या ब्रोचची किंमत १ कोटी १३लाख ५१ हजार ०८७ पासून १ कोटी ३२ लाख २६ हजार ०८५ इतकी आहे. १९१४ मध्ये कार्टियरच्या तिसऱ्या पिढीतील Jacques Cartier यांनी या panther brooch चे डिझाईन केले आहे. पँथरचा उपयोग सामर्थ्य आणि सामर्थ्याचे प्रतिनिधित्व दर्शवण्यासाठी केला जातो आणि ब्रोचमध्ये या वैशिष्ट्यांचा अंतर्भाव असल्याचे म्हटले जाते.
रेड कार्पेटवरही झळकला brooch
यापूर्वी रेड कार्पेटवरही हे ब्रोच झळकले आहे. अनेक सेलिब्रिटींनी ते त्यांच्या सूट किंवा ड्रेसवर लावले होते. अँजेलिना जोली, केट ब्लँचेट आणि सारा जेसिका पार्कर सारख्या सेलिब्रिटींनी परिधान केले होते. याशिवाय, जगभरातील नववधूंसाठी ही एक लोकप्रिय गोष्ट बनली आहे.
वर्ल्ड युनिव्हर्सिटी ऑफ डिझाईनच्या मते, कार्टियरच्या निर्मितीमध्ये अनेक वर्षांपासून विविध प्राण्यांचे चित्रण करण्यात आले आहे. यामध्ये, सिंह, वाघ, अस्वल, फुलपाखरे, साप, कासव यांचे ब्रोच बनवले होते. एक काळ असा होता की, वटवाघळांचा आकार शतकानुशतके वापरला जात असे.