khabarbat

khabarbat logo

Join Us

Advertisement

महाविकास आघाडीत बिघाडी; राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस वेगळी चूल मांडणार ?

पुणे : राज्यात भाजपला रोखण्यासाठी अखेर महाविकास आघाडीने कंबर कसली अशी चिन्हे दिसत आहेत. तथापि, विधानसभा आणि लोकसभेच्या आगामी निवडणूका एकत्र लढवणार की राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस हे ३ पक्ष स्वतंत्रपणे लढवणार असा मुध्दा आता राजकीय वर्तुळात चर्चेला आला आहे.

मागील काळात राज्यातील सर्व निवडणुका मविआ आघाडी म्हणून तिन्ही पक्ष एकत्र लढले होते. मात्र आता राष्ट्रवादीने वेगळी भूमिका घेतली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये जवळपास फूट पडली असल्याचे मानले जात आहे. कारण, आगामी काळात पुरंदर विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी स्वबळावर लढवणार असा निर्णय पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे.

याशिवाय, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी निवडणुका देखील स्वबळावर लढविण्याचा निर्णय पुरंदर तालुका राष्ट्रवादीने घेतला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसला ग्रामीण भागात लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे स्वबळावर लढल्यास राष्ट्रवादीसाठी ते फायदेशीर ठरू शकते त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे..

दरम्यान राष्ट्रवादीने पुरंदर विधानसभा स्वबळावर लढल्यास महाविकास आघाडी म्हणून ही जागा काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येऊन लढवणार की हे तिन्ही पक्ष स्वबळावर लढवणार अशी जोरदार चर्चा आहे. मागील विधानसभेत शिवसेनेच्या उमेदवाराला काँग्रेसचे संजय जगताप यांनी पराभूत केले होते, हे येथे उल्लेखनीय ठरावे.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »