वॉशिंग्टन : आता ट्विट करणे आणि पाहणे या आजवरच्या मोफत सेवा येथून पुढे Paid होणार आहेत. ट्विटरचे प्रमुख इलॉन मस्क यांनी ही माहिती दिली. Twitter आता सब्सक्रिप्शन लागू करीत असून त्यामुळे सेवा महागणार आहेत. सब्सक्रिप्शन भरणाऱ्या वापरकर्त्यांना कमी जाहिराती पाहायला मिळतील. शिवाय जाहिरात-मुक्त सेगमेंट देखील उपलब्ध असेल. सोशल नेटवर्क ट्विटरला ऑक्टोबरमध्ये अधिग्रहण केल्यापासूनच मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.
ट्विटरवर जाहिराती खूप जास्त आणि खूप मोठ्या आहेत. यातून सुटका मिळविण्यासाठी अधिक पैसे माजून सब्सक्रिप्शनची सुविधा देण्यात येणार आहे. जे लोक ही सुविधा घेतील, त्यांना एकही जाहिरात दिसणार नाही, असे मस्क यांनी ट्विटमध्ये म्हटले.
Elon Musk has announced a more expensive ad-free Twitter subscription plan in a bid to massively reduce costs while building up revenue.https://t.co/Doa7ZnagmO
— WION (@WIONews) January 22, 2023
गेल्या वर्षाच्या अखेरीस मस्क यांनी Twitter च्या ७,५०० कर्मचाऱ्यांपैकी निम्म्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते. या निर्णयामुळे कंपनीकडे कंटेंट मॉडरेशनसाठी अपुरे कर्मचारी आहेत. मस्क म्हणाले की, महसूल निर्माण करताना खर्च मोठ्या प्रमाणात कमी करणे ही आपली रणनीती आहे. ट्विटरची ब्लू टीक सब्सक्रिप्शन सेवा हे उद्दिष्ट गाठण्यास मदत करेल.
कंपनीच्या वेबसाईटवरील माहितीनुसार अमेरिकेत या सेवेची किंमत दरमहा ११ डॉलर असून apple च्या आयओएस आणि गुगलच्या अँड्रॉइड मोबाइल ऑपरेटिंग सिस्टिमवर ही सेवा उपलब्ध आहे. वेब सब्सक्रिप्शन दरमहा ८ डॉलर किंवा, सवलतीसह प्रति वर्ष ८४ डॉलरमध्ये उपलब्ध आहे..