मुंबई : LIC (भारतीय आयुर्विमा महामंडळ) मध्ये ९,३९४ प्रशिक्षणार्थी विकास अधिकारी पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अर्ज मागवले आहेत.
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला LIC ची अधिकृत वेबसाइट licindia.in वरून ऑनलाइन अर्ज करता येईल. अर्ज करण्याची अंतिम तारीख १० फेब्रुवारी २०२३ आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० फेब्रुवारी २०२३
शैक्षणिक पात्रता
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार, शैक्षणिक पात्रतेचा तपशील भरती अधिसूचनेत पाहू शकतात.
वयोमर्यादा
सर्व अर्जदार उमेदवारांची वयोमर्यादा २१ वर्षे ते ३० वर्षे असावी. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयात सवलत दिली जाईल.
अर्जासाठी शुल्क
या पदांसाठी अर्ज करणार्या सामान्य श्रेणीतील उमेदवारांना अर्ज फी म्हणून ७५० रुपये भरावे लागतील, तर SC, ST प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून १०० रुपये भरावे लागतील.
निवड प्रक्रिया
LIC च्या या पदावर निवड होण्यासाठी, उमेदवारांना ऑनलाइन चाचणी आणि मुलाखत प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. शॉर्टलिस्ट झाल्यानंतर उमेदवारांना प्री-रिक्रूटमेंट मेडिकल टेस्ट द्यावी लागेल.