मुंबई I स्टेट बँक ऑफ इंडिया या सरकारी बँकेतील खात्यातून कोणतेही व्यवहार न करता आपोआप पैसे कापले जात असतील तर पैसे का कापले जात आहेत? जाणून घ्या.
सध्या अनेक ग्राहकांच्या खात्यातून पैसे आपोआप कापले जात आहेत. यासोबतच १४७.५० रुपयांच्या कपातीचा मेसेज येत आहे. अशा परिस्थितीत हा मेसेज पाहून अनेक ग्राहकांनी बँकेत तक्रारी दाखल केल्या आहेत.
सध्या अनेक ग्राहकांच्या खात्यातून पैसे आपोआप कापले जात असल्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने याबाबत माहिती देताना एसबीआयकडून ग्राहकांच्या खात्यातून हे पैसे डेबिट करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. बँक हे पैसे मेंटेनन्स चार्ज म्हणून घेत आहे. हे पैसे बँकेतून वर्षातून एकदाच घेतले जातात. बँकेने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.
हे पैसे बँकेकडून शुल्क म्हणून कापले जातात. त्याच वेळी, बँकेने जारी केलेल्या डेबिट कार्डसाठी, ग्राहकांकडून वार्षिक १२५ रुपये वसूल केले जातात. १८ टक्के दराने जीएसटी जोडला जातो, त्यानंतर ही रक्कम १४७.५० रुपये होते.
याशिवाय जर कोणत्याही ग्राहकाला त्याचे डेबिट कार्ड बदलायचे असेल तर त्यासाठी त्याला जीएसटी शुल्कासह बँकेला ३०० रुपये भरावे लागनार आहेत.