यमराजाने धडकी भरविली; RTO ने शिस्त शिकवली
औरंगाबाद I सुपरहिट्स ९३.५ रेड एफ एम आणि प्रादेशिक परिवहन विभाग, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने वाहतूक सुरक्षा अभियानाअंतर्गत वाकेथॉन व ट्रॅफिक सिग्नल्स वर यमराज प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी वाहतुकीस शिस्त लागावी, चालकांनी सीट बेल्ट व हेल्मेट वापरणे किती महत्वाचे आहे, रस्त्याच्या उजव्या बाजूने चालावे अशा नियमाविषयी जन जागृती करण्यात आली. हेल्मेट व सीटबेल्ट वापरणाऱ्या चालकांना रेड एफ एम चे RJ रोहन, आणि अर्चना व प्रांजली यांनी गुलाब पुष्प देऊन अभिनंदन केले.
दुपारच्या सत्रात “चालान से बचोगे यमराज से नही” हा उपक्रम शहरातील विविध ट्रॅफिक सिग्नलवर राबविण्यात आला. हेल्मेट वापरणे किंवा गाडी चालविताना सीटबेल्ट लावणे या मूलभूत गरजा आहेत ज्या रस्ते अपघातापासून आपले रक्षण करू शकतात असा संदेश देण्यात आला. यावेळी रेड एफ एम चे प्रोग्रॅमिंग हेड अमोल देवाळे आर जे रोहन , आर जे अर्चना , आर जे प्रांजली यांनी परिवहन अधिकाऱ्यांसोबत वाहन चालकांमध्ये जनजागृती केली. यमराजच्या वेशभूषेत सामाजिक कार्यकर्ते सुमित पंडीत यांनी उत्तम भूमिका निभावली व सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
यावेळी प्रादेशिक परिवहन विभाग, औरंगाबादचे प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे, सहायक प्रादेशिक अधिकारी मनीष दौंड, दीपक मेहरकर, मोटार वाहन निरीक्षक निलेश लोखंडे, मोटार वाहन निरीक्षक गांगोडे, सहायक मोटार वाहन निरीक्षक संदीप शेलार, पूजा वानखेडे, पूजा कुचे, ऐश्वर्या कराड, प्रमोद कठाने, विकास डोंगरे, सचिन मगरे उपस्थित होते. या अभियानासाठी ऍम्ब्युलन्स हेल्प रायडर्स ग्रुप व गरुड झेप अकॅडेमीचे विद्यार्थी व विद्यार्थींनीनी सहकार्य केले.