औरंगाबाद I सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असते. बॉलीवूडच्या कार्यक्रमांमध्येही ती अनेकदा दिसली. सारा दिसायला खूप सुंदर आहे, तिचा फॅशन सेन्सही उत्कृष्ट आहे. ती आजकाल अनेक जाहिराती आणि मॉडेलिंगमध्येही दिसत आहे. याशिवाय तीला प्रवासाचीही खूप आवड आहे. ती अनेकदा तिचे फोटो, अनेक व्हिडिओ आणि प्रवासाचे फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करत असते.

सारा दिसण्यात जितकी सुंदर आहे तितकीच तिचा ड्रेसिंग सेन्सही वाखाणण्याजोगा आहे. येथे सारा तेंडुलकरने एक सुंदर मोहरी पिवळा बॉडीकॉन ड्रेस परिधान केला आहे, ज्यामध्ये ती खूप फ्रेश आणि क्यूट दिसत आहे. व्हेकेशन लूकसाठी तुम्हीही साराचा हा लूक ट्राय करू शकता.
travel लूकमध्ये सारा खूपच सुंदर दिसत आहे. येथे तीने आपला लूक अतिशय कुल ठेवला आहे आणि पांढऱ्या टाईट ट्राउजरसह लॉक्ट ऑलिव्ह ग्रीन शर्ट पेअर केला आहे. सारा एकदम फ्रेश दिसत आहे. तुम्हीही साराचा हा लूक रिक्रिएट करू शकता.