khabarbat

khabarbat logo

Join Us

Advertisement

Jobs : ७५ हजार नोकर भरती रखडणार

मुंबई : राज्यातील ७५ हजार नोकर भरतीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सरकार आता समिती स्थापन करणार आहे. तथापि, TCS आणि IBPS कडे मर्यादित ऑनलाईन परीक्षा केंद्र असल्याने ही नोकर भरती रखडण्याची शक्यता अधिक आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात चर्चा झाली. येत्या दोन दिवसात यावर निर्णय होणार आहे. एवढी मोठी नोकरभरती राबविण्यासाठी अडथळे कसे दूर करायचे यावर समिती काम करणार आहे.

राज्यात ७५ हजार नोकरभरती करत असताना ऑनलाईन परीक्षा सेंटर कसे उपलब्ध करायचे यासंदर्भात संबंधित कंपन्यांच्या समोर मोठा प्रश्न आहे. जिल्हा निवड समिती भंडारा यांनी आक्षेप घेतल्यानंतर मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा करण्यात आली आहे. नोकरभरतीची प्रक्रिया राबवण्यासाठी राज्य सरकारने TCS आणि IBPS या कंपन्यांची नियुक्ती केली. मात्र या कंपन्यांकडे मर्यादित परीक्षा सेंटर आहेत. त्यामुळे येत्या दोन दिवसात यावर निर्णय होणार आहे.

भंडारा जिल्ह्यासह राज्यातल्या अनेक ठिकाणी या दोन्ही कंपन्यांचे ऑनलाईन परीक्षा केंद्र नाहीत. त्यामुळे परीक्षा घ्यायच्या कशा असा प्रश्न निर्माण झाला आहे. TCS कंपनी एकावेळी राज्यात ७५०० ते ८००० पर्यंत उमेदवारांची परीक्षा घेऊ शकते तर IBPS कंपनी १० हजार ते १५ हजार एका वेळी एका शिफ्टमध्ये परीक्षा घेऊ शकते. त्यामुळे या कंपन्यांच्या मर्यादेपेक्षा जास्त अर्ज आले तर परीक्षा घ्यायची कशी असा प्रश्न निर्माण झाला आहे. सदस्य सचिव जिल्हा निवड समिती भंडारा यांनी ग्रामविकास विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांना पत्र लिहून माहिती दिली आहे. त्यामुळे ७५ हजार नोकर भरती रेंगाळण्याची शक्यता आहे.

विभाग आणि रिक्त पदे खालीलप्रमाणे…

गृहविभाग- ४९ हजार ८५१

सार्वजनिक आरोग्य विभाग : २३ हजार ८२२

जलसंपदा विभाग : २१ हजार ४८९

महसूल आणि वन विभाग : १३ हजार ५५७

वैद्यकीय शिक्षण विभाग : १३ हजार ४३२

सार्वजनिक बांधकाम विभाग : ८ हजार १२

आदिवासी विभाग : ६ हजार ९०७

सामाजिक न्याय विभाग : ३ हजार ८२१

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like