नवी दिल्ली I आदित्य आणि अमित या समलिंगी जोडप्याने सोशल मीडिया यूजर्सना मोठा धक्का दिला. २०१९ मध्ये या समलिंगी जोडप्याने चार वर्षांपूर्वी अमेरिकेत मोठ्या थाटामाटात लग्न केले होते. दरम्यान आता आपणास बाळ होणार असल्याची घोषणा केली आहे.

या दोघांनी सोनोग्राफीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. समलिंगी जोडप्याला मूल कसे होऊ शकते?, हा प्रश्न सद्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आदित्य आणि अमित यांना IVF वर खूप खर्च करावा लागला. अमितने सांगितले की, दोघे चार वर्षांपूर्वी एका मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीत भेटले होते, त्यानंतर त्यांनी कायमचे एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. या समलिंगी जोडप्याने सांगितले की ते मे महिण्यात आलप्या पहिल्या अपत्याचे स्वागत करणार आहेत. लग्न केल्यानंतर पालक बनण्यासाठी ते रीसर्च करत होते.
दरम्यान या दोघांनी IVF बद्दल वाचले. ते या तंत्रज्ञानाच्या मदतीने ते आपल्या जैविक मुलाला जन्म देणार आहेत. यामध्ये शुक्राणू आणि स्त्री दात्याचे अंडे स्वतंत्रपणे फलित करून जैविक मूल जन्माला येते.
आदित्य आणि अमित यांनी पीपल मॅगझिनने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. आदित्य मदिराजू म्हणाले की, ” आम्ही लग्नाआधी पालक होण्याचा विचार करत होतो. आम्हाला सामान्य जोडप्याप्रमाणे जगायचे आहे आणि आम्हाला मदर्स डे, फादर्स डे आणि इतर सर्व सुट्ट्याही साजरे करायच्या आहेत. लोकांना आमचे पालक होणे अशक्य वाटायचे पण आता सर्व काही शक्य आहे.”