khabarbat

Advertisement

Cold Wave : महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढणार; कानपूरमध्ये २५ बळी

औरंगाबाद – दिल्ली I उत्तर भारतात थंडीची लाट आली असून कानपूरमध्ये सर्वाधिक कडाक्याची थंडी असल्याचे दिसून आले. त्यामुळे हृदयविकाराचे प्रमाण वाढले आहेत. कानपूरमध्ये रात्रीचे तापमान ३.२ अंश सेल्सिअसवर पोहोचले. गुरुवारी रात्रीपर्यंत केवळ दोन सरकारी रुग्णालयात हृदयविकाराचा झटका आणि ब्रेन स्ट्रोकमुळे २५ जणांना जीव गमवावा लागला. कार्डिओलॉजीच्या ओपीडीमध्ये रुग्णांची संख्या जास्त राहिली.

@aurangabad

उत्तर भारतातील या वातावरणाचा परिणाम महाराष्ट्रात जाणवू लागला आहे. खान्देशसह राज्यात गुरुवारपासून राज्यात काही ठिकाणी दाट धुके, अवकाळी पाऊस आणि थंडीचा जोर वाढला आहे. अस्थमा, हृदय विकार असणाऱ्या लोकांनी विशेष काळजी घ्यावी असे डॉक्टरांनी सुचवले आहे.

दरम्यान, लक्ष्मीपत सिंघानिया हृदयरोग संस्थेचे संचालक डॉ. विनय कृष्णा यांनी सांगितले की, हृदयविकाराच्या समस्या घेऊन ७२३ रुग्ण आले होते. त्यापैकी ४१ रुग्णांना दाखल करुन घेतले. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच १५ रुग्णांचा मृत्यू झाला. त्याचवेळी उपचारादरम्यान ७ रुग्णांचा मृत्यू झाला. दुसरीकडे, उन्नावच्या ६५ वर्षीय संध्या, कल्याणपूरच्या ७४ वर्षीय राजोल आणि हलत हॉस्पिटलमध्ये आणलेल्या कन्नौजच्या ७० वर्षीय झाकीर यांचा ब्रेन स्ट्रोकमुळे मृत्यू झाला.

राजस्थान -६ अंश तापमानाने गारठले आहे. तर शिमला-नैनितालपेक्षा जास्त थंडी ही दिल्लीत पडत आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत आज तापमान १.८ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत थंडी हवेमुळे आँरेज अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागानुसार ७ जानेवारीपासून डोंगराळ भागात पुन्हा बर्फवृष्टी सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्तर भारतातील मैदानी भागात तापमानात आणखी घसरण होऊ शकते त्यामुळे थंडी वाढणार आहे.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »