सोलापूर I दीड टन वजनाचा व एक कोटी रुपये किमतीचा गजेंद्र नावाचा रेडा तसेच जगातील सर्वात लांब १५ इंच लांब गव्हाची लोंबी व १४० ते १५० दाणे तयार होणारी कुदरत १००, आठ इंच लांबीची देशी गव्हाची लोंबी, गोड्या पाण्यातील मोत्याची शेती, जगातील सर्वात लांब एक फूट लांबीची देशी मिरची आपल्याला पाहायला मिळणार आहे, ते सोलापुरात सुरु असलेल्या सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनात.
श्री सिद्धेश्वर देवस्थान सोलापूर, कृषी विभाग आत्मा व जिल्हा परिषद सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूरच्या होम मैदानावर २९ डिसेंबर ते २ जानेवारी दरम्यान ५२ व्या सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनांत ३०० पेक्षा जास्त कंपन्यांनी सहभाग नोंदवला आहे.
या प्रदर्शनामध्ये दुग्धोत्पादन, रेशीम पीक, मधुमक्षिका पालन ,वर्टीकल फार्मिंग, आधुनिक कृषी अवजारे, खते, औषधे ,बी- बियाणे, अवजारे ,यंत्रसामुग्री,, ट्रॅक्टर्स, फार्म इक्विपमेंट, सिंचन, फलोत्पादन ,पॅकेजिंग, व साठवणूक ,बायोटेक्नॉलॉजी, टिशू कल्चर, पाणी व्यवस्थापन, ऑटो फार्मिंग टेक्नॉलॉजी, सौरऊर्जा, पशुखाद्य व औषधे, डेरी इक्विपमेंट, पोल्ट्री सोल्युशन, कृषी अर्थसाह्य, लो बजेट हाऊसिंग सोल्युशन ,कृषी साहित्य, नियतकालिके अशा संस्थांचा सहभाग असणार आहे.