औरंगाबाद येथे MIM ची महत्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत पक्षाच्या कार्यकारिणीत मोठे निर्णायक बदल करण्यात आले आहेत. विशेषतः MIM चे नेतृत्व आणि संघटनात्मक मुद्यांवर चर्चा झाली. शहर कार्यकारिणीत नव्या तरुणांना संधी देण्यात आली आहे. एकंदरीत औरंगाबाद महापालिकेच्या तसेच विधान सभेच्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने MIM ने धोरणात्मक व्यूहरचनेची तयारी सुरु केली आहे.
या बैठकीत दलित आणि वंचितांना पुन्हा सोबत घेण्याचे सूतोवाच करण्यात आले. दलित आणि मुस्लिम समाजातील वंचितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी MIM प्रयत्न करणार असल्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. उल्लेखनीय म्हणजे उध्या २१ डिसेंबर रोजी आरक्षणाच्या मागणीसाठी खा. इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली MIM चे हजारो कार्यकर्ते नागपुरातील विधान भवनावर धडक देणार आहेत.
MIM च्या या बैठकीस बिलाल जलील, जिब्रान काद्री, ताहेर काद्री, युवा नेते वाजिद जहागीरदार हे होते. AIMIM च्या औरंगाबाद शहर कार्यकारिणीत फेरोज खान, इम्रान खान, शेख मुश्ताक, रोशन खान, अल्ताफ शेख, शेख सोहेल यांचा समावेश करण्यात आला. AIMIM चे औरंगाबाद शहराध्यक्ष मोहम्मद असरार हे या बैठकीचे संयोजक, निमंत्रक होते.