अफशीन इस्माईल गदरजादेह या अवघ्या ६.५ किलो वजनाच्या तरुणाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने घेतली आहे. जगातील सर्वात कमी उंचीचा व्यक्ती म्हणून त्याची नोंद करण्यात आली आहे. अफशीनची उंची फक्त २ फूट १.६८ इंच एवढी आहे. अफशीनची उंची एकूण तीन वेळा मोजण्यात आली. त्यानंतरच त्याला जगातील सगळ्यात लहान व्यक्तीचा किताब देण्यात आला.

अफशीनच्या अगोदर सगळ्यात लहान व्यक्ती म्हणून कोलंबियाच्या एडवर्ड नीनो हर्नांडेज नावाच्या व्यक्तीची नोंद घेतली गेली होती. एडवर्डची उंची २ फूट ४.३८ इंच एवढी होती.
Guinness world रेकॉर्डनुसार, २० वर्ष वयाचा अफशीन इस्माईल गदरजादेहचा जन्म ईरानच्या पश्चिम अझरबैजान प्रांतातील बुकान काउंटीमधील एका गावात झाला. त्याचे वजन सध्या ६.५ किलो आहे. अफशीनचे कुटुंब फार हलाखीचे जीवन जगत असून दैनंदिन जेवणासाठी त्यांना अतिशय कष्ट करावे लागतात. अफशीन कधीच शाळेत गेला नाही, मात्र तो अलीकडेच स्वत:चे नाव लिहायला शिकला आहे.