बेळगाव : स्वा. सावरकर म्हटले कि, काँग्रेसला सतत भीती वाटत असते, का कोण जाणे? अर्थातच ही बाब काही नवी नाही. अगदी अलीकडेच ‘ नफरत छोडो, भारत जोडो’चा नारा देत राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ‘भारत जोडो’ यात्रा निघाली, मात्र सावरकरांविषयीची नफरत काही दूर झालेली नव्हती. या यात्रेतही राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी स्वा. सावरकरांवर तोंडसुख घेतले. आज सोमवारी बेळगावात कर्नाटक विधान सभेचे अधिवेशन सुरु झाले त्यावेळी देखील काँग्रेसचा सावरकर विरोध उफाळून आला. कारण काय तर, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे तैलचित्र सभागृहात लावण्याची मागणी BJP आमदारांकडून करण्यात आली आणि या तैलचित्राचे आज अनावरण करण्यात आले. त्यामुळे काँग्रेसच्या आमदारांनी विधान सभेचा उंबरठा देखील ओलांडला नव्हता. पायऱ्यावरच निषेध आंदोलन सुरु केले. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते सिद्धरामय्या यांनी सभापतींना पत्र लिहून महर्षी वाल्मिकी, बसवण्णा, कनकदास, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल यांचे तैलचित्र लावण्याची मागणी केली.

Belagavi | VD Savarkar's portrait unveiled in Karnataka Assembly hall. Congress MLAs have staged a protest with LoP Siddaramaiah writing to Speaker to install portraits of personalities like Valmiki, Basavanna, Kanaka Dasa, BR Ambedkar, Sardar Vallabhbhai Patel and many others. pic.twitter.com/Esgdl8bdgP
— ANI (@ANI) December 19, 2022
[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]