औरंगाबाद : मुंबईतील स्त्री उद्योग वर्धीनी या संस्थेद्वारे या वर्षीच्या चौथ्या राज्यस्तरीय ‘कल्याणी’ पुरस्काराचे नुकतेच वितरण करण्यात आले. औरंगाबादच्या सोहं गृह उद्योगला हा पुरस्कार मिळाला. संचालिका सौ. निता श्रीपाद सबनीस यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
दरम्यान, यापूर्वी सोहं गृह उद्योगला ‘मसिआ’ने सन्मानित केले आहे. ज्या महिला जिद्दीने स्वतःचा व्यवसाय उभारतात आणि यशस्वीपणे चालवतात त्यांच्या कार्याचा गौरव करण्याच्या हेतूने हा ‘कल्याणी’ पुरस्कार दिला जातो.
महिलांना व्यवसायासाठी कर्ज, नव्या योजना यांचा लाभ मिळवून देण्यासाठी स्त्री उद्योग वर्धीनी ही संस्था मदत करीत असते. महाराष्ट्रातील बहुसंख्य महिला या परिवारात सामिल आहेत. या संस्थेच्या अध्यक्षा श्वेता सरवणकर यांनी राज्यभरातील महिलांना या माध्यमातून आश्वासक व्यासपीठ मिळवून दिले आहे. कल्याणी पुरस्कारासाठी निवड केल्याबद्दल सोहं गृह उद्योगच्या संचालिका सौ. निता सबनीस यांनी स्त्री उद्योग वर्धीनी आणि सर्व सहकारी यांचे आभार व्यक्त केले आहेत.