khabarbat

Advertisement

  • Advertise with khabarbat.com

Delhi Pollution : प्रदूषणामुळे दिल्लीत प्राथमिक शाळा बंद

नवी दिल्ली : प्रदूषणामुळे दिल्लीमध्ये दैनन्दिन सामान्य जीवनमान कठीण झाले आहे. हवेतले प्रदूषण एवढे वाढले , की उद्या (शनिवार) पासून प्राथमिक शाळा बंद ठेवण्याचा निर्णय दिल्ली सरकारने घेतला आहे.

आज शुक्रवारी सकाळी दिल्लीतील एअर क्वालिटी इंडेक्स ४७२ वर पोहोचला होता . दिल्लीमध्ये दाट धुके पसरल्याचे चित्र आहे. हवेच्या गुणवत्तेचे प्रमाण ४५०च्या वर गेल्यानंतर ते फुप्फुसासाठी धोकादायक मानले जाते. त्यामुळे उद्यापासून दिल्लीतील प्राथमिक शाळा बंद ठेवल्या जाणार आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

तर नोएडामध्ये आठवीपर्यंत्या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला आहे. दिल्लीच्या अनेक परिसरामध्ये हवेची गुणवत्ता घसरलेली आहे. यामध्ये मुंडका, आनंद विहार, जहाँगिरपुरी, विवेक विहार, नरेला, अलीपूर, दिल्ली विद्यापीठ या भागांचा समावेश आहे.

दिल्लीतील प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे. येत्या १० तारखेला त्यावर सुनावणी होईल. प्रदुषन कमी करण्याच्या हेतूने दिल्लीमध्ये डिझेलवर चालणाऱ्या वाहनांवर तुर्त बंदी घालण्यात आलेली आहे.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »