khabarbat

khabarbat logo

Join Us

Advertisement

twitter war : पराग अग्रवालने खुन्नस दिली, एलन मस्कने बाजी मारली

सॅनफ्रान्सिस्काे : एकिकडे रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे जगभर खळबळ माजली असतानाच, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क आणि मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटर यांच्यातील कराराची खूप चर्चा झाली. अखेर 28 ऑक्टोबरला ट्विटर पूर्णपणे मस्कच्या हाती आले. सर्वप्रथम कंपनीचे सीईओ पराग अग्रवाल यांची उचलबांगडी करण्यात आली.

भारतीय वंशाचे पराग अग्रवाल सुरुवातीपासूनच मस्कच्या विरोधात होते. मस्क यांनी ट्विटरसाठी बोली लावल्यापासून सीईओ पराग अग्रवाल यांच्याशी त्यांचा वाद सुरू होता. एलन मस्क यांनी ट्विटर विकत घेण्याची ऑफर दिल्यानंतर पराग अग्रवाल यांनी मस्क यांना खुन्नस देणारी अनेक विधाने केली, ज्यामुळे दोघांमधील तणाव स्पष्टपणे उघड झाला. पराग अग्रवाल यांनी कराराची घोषणा होताच टाऊन हॉलमध्ये कर्मचाऱ्यांना सांगितले की, ‘कंपनीचे भविष्य आता अंधारात आहे, मला माहित आहे की ती कोणत्या दिशेने जाईल.’

पराग अग्रवाल यांच्या या वक्तव्यानंतर त्यांना ट्विटरवरून काढले जाईल अशी चर्चा झडत होती. 28 ऑक्टोबर 2022 रोजी एलन मस्कने ट्विटरचे डील पूर्ण केले आणि सूत्र हातात घेताच पराग अग्रवाल यांना बाहेरचा रस्ता दाखवला. त्यांच्यासोबत कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी नेड सेगल यांनाही बडतर्फ करण्यात आले. याशिवाय कायदेशीर धोरण विभागाच्या प्रमुख विजया गडदे यांचीही हकालपट्टी करण्यात आली.

भारतीय वंशाचे पराग अग्रवाल हे गेल्या वर्षी डिसेंबर 2021 मध्ये ट्विटरचे सीईओ बनले होते. अग्रवाल 10 वर्षांपूर्वी सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून ट्विटरमध्ये रुजू झाले आणि 2017 मध्ये कंपनीचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी बनले. त्यानंतर जॅक डोर्सीच्या राजीनाम्यानंतर पराग अग्रवाल यांना कंपनीचे सीईओ बनवण्यात आले. मात्र ते सीईओ बनताच एलोन मस्क यांनी ट्विटर विकत घेण्याची ऑफर दिली आणि वर्षभरातच पराग अग्रवाल यांना कंपनीतून डच्चू मिळाला.

web heading : Elon Musk twitter’s new boss. महत्त्वाच्या ताज्या घडामाेडींसाठी वाचत राहा ‘खबर बात’ अर्थात https://khabarbat.com तसेच फाॅलाे करा फेसबुक, ट्विटर, टेलिग्राम, इंस्टाग्रामवर.

[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like