मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने गुरुवारी वित्तीय संस्थांना आणि बँकांना गृह मंत्रालयाने दहशतवादी घोषित केलेल्या दहा व्यक्तींच्या खात्यांबद्दल माहिती देण्यास सांगितले. गृह मंत्रालयाने 4 ऑक्टोबर रोजी हिजबुल मुजाहिदीन, लष्कर-ए-तैयबा आणि इतर प्रतिबंधित संघटनांच्या एकूण दहा सदस्यांना यूएपीए अंतर्गत दहशतवादी म्हणून घोषित केले होते.
ज्यांना सरकारने दहशतवादी घोषित केले आहे त्यामध्ये हबीबुल्ला मलिक उर्फ साजिद जट (पाकिस्तानी नागरिक), बासित अहमद रेशी (जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला आणि सध्या पाकिस्तानात), इम्तियाज अहमद कंडू उर्फ सज्जाद (जम्मू-काश्मीर के सोपोर आणि सध्या पाकिस्तानात), जफर इकबाल उर्फ सलीम (पूंछ आणि सध्या पाकिस्तानात) आणि शेख जमील-उर-रेहमान उर्फ शेख साहब (पुलवामा) यांचा समावेश आहे.
आरबीआयने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, ‘केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनांची कायद्याच्या अधीन राहून अंमलबजावणी करावी’. या सुचनेमध्ये मध्ये बँका, अखिल भारतीय वित्तीय संस्था (एक्झिम बँक, नाबार्ड, एनएचबी, सिडबी आणि एनएबीएफआईडी आणि एनबीएफसी यांचा समावेश आहे.